वीज कंत्राटी कामगार करणार मंत्र्यांच्या घरासमोर उपोषण !! ऊर्जामंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा !!
schedule01 Aug 24 person by visibility 893 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : आचारसंहितेची चाहूल लागल्यानंतर भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने ऊर्जा खात्यातील कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आता 12 ते 17 ऑगस्ट 2024 या कालावधीत साखळी उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. 20 ऑगस्ट रोजी सरकारमधील सर्व मंत्र्यांच्या दारात लाक्षणिक आंदोलन तर 24 ऑगस्ट रोजी रेशीमबाग मैदान ते राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरापर्यंत मोर्चा काढून तेथे वीज कंत्राटी कामगार बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचे संघटनेचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात यांनी सांगितले
तीनही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांचे शोषण कायमस्वरूपी थांबण्यासाठी हरियाना सरकार प्रमाणे कंत्राटदार विरहित वयाच्या 60 वर्षा पर्यंत शाश्वत रोजगार मिळवा, मागणी पत्रका प्रमाणे वेतनात वाढ मिळावी, व प्रलंबित समस्यां सोडवाव्यात या मागण्या साठी हे आंदोलन असल्याचे प्रदेश सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी कळवले. राज्यातील सर्व संघटना व कामगार यांनी या निर्णायक आंदोलनास पाठिंबा द्यावा असे आवाहन संघटनमंत्री उमेश आणेराव यांनी केले.