Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
णण तत लोणेरे विद्यापीठाच्या कार्यवाह कुलगुरुपदी डॉ. राजनिश कामतकोल्हापूर सराफ सुवर्णकार संघाचा शनिवारी जिल्हास्तरीय मेळावादहा गावांच्या समावेशासह हद्दवाढीस सर्वांची संमती : नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळडॉ.. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात राज्यस्तरीय कृषी पर्यटन कार्यशाळा कोल्हापुरात तीन एप्रिलला सहकार सम्राज्ञी पुरस्कार वितरणघोषवाक्य स्पर्धेत मुख्याध्यापक संजय सौंदलगे राज्यात प्रथमजिल्हा परिषदेत शहिदांना अभिवादन कळंबा फिल्टर हाऊसच्या दुरावस्थेबाबत कृती समिती आक्रमकविद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी जिद्द- चिकाटी- शिस्त व आत्मविश्वास या चतुःसूत्रीचा वापर करावा

जाहिरात

 

लोणेरे विद्यापीठाच्या कार्यवाह कुलगुरुपदी डॉ. राजनिश कामत

schedule25 Mar 26 person by visibility 74 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मुंबई येथील डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे  कुलगुरू डॉ. राजनिश कमलाकर कामत यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे येथे कार्यवाह कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.राज्यपाल तथा कुलपती जिष्णू देव वर्मा यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती झाली.  कामत यांन कार्यवाह कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला.कामत हे उच्च शिक्षण क्षेत्रातील एक प्रतिष्ठित व अनुभवी शैक्षणिक नेते असून त्यांना २८ वर्षांहून अधिक कालावधीचा अध्यापन, संशोधन व प्रशासनाचा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे विज्ञान व तंत्रज्ञान संकुलाचे अधिष्ठाता तसेच संगणक विज्ञान विभागप्रमुख म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

विशेष म्हणजे, त्यांनी यापूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर तसेच सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन (डी-नोवो दर्जा प्राप्त अभिमत विद्यापीठ) येथे कार्यवाह कुलगुरू म्हणून यशस्वीपणे काम पाहिले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. कामत यांनी सांगितले की, *“भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या विद्यापीठासाठी मी पूर्ण समर्पणाने आणि निष्ठेने कार्य करणार आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि सामाजिक बांधिलकी यांना केंद्रस्थानी ठेवून विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न करेन.”

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes