Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पाणीपट्टी दरवाढीला महापालिकेच्या सभेत मंजुरी, दरवाढीतून मिळालेल्या रकमेचा विनियोग पाणी पुरवठा योजनेसाठीचजिल्हाधिकारी, सीईओंच्या उपस्थितीत जल जीवन मिशन, घनकचरा - सांडपाणी व्यवस्थापनची आढावा बेठकमहापालिकेच्या शाळेतील फलकावर शिक्षकांच्या जातीचा उल्लेख ! नगरसेवकांनी उघडकीस आणला प्रकार !!उद्योगविश्वाच्या बदलत्या गरजा ओळखा; टीसीएस उपाध्यक्षांचा टीकेआयईटी विद्यार्थ्यांना मंत्रमहापालिका शाळांच्या सेवा - सुविधेकडे नेहा तेंडुलकरने वेधले सभागृहाचे लक्षडॉ. प्रभाकर कोरे यांना घाळी समाजभूषण पुरस्कार, २४ ऑगस्टला वितरणकोल्हापूर प्रेस फोटोग्राफर क्लबचे पुरस्कार जाहीर !  अनिल वेल्हाळ, संजीव भोर यांना पुरस्कार ! !ताराबाई पार्कातील गोकुळ शॉपीला नवा लूक, दुधासह दुग्धजन्य पदार्थ उपलब्धहॉस्पिटल चालविण्याचा परवाना नाही, मात्र चक्क सहा वर्षे प्रॅक्टिस ! एक हॉस्पिटल सील, एका डॉक्टरांना आर्थिक दंड ! !प्रत्येक नागरिकाने कायद्याबाबत सजग असावे -: पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड

जाहिरात

 

विवेकानंद कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉ. मिलिंद हुजरे

schedule08 Jul 26 person by visibility 427 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री स्वामी  विवेकानंद शिक्षण संस्थेच्या येथील विवेकानंद कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉ. मिलिंद हुजरे यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. हुजरे यांनी प्राचार्य म्हणून पदभार स्वीकारला. त्यानिमित्त स्वागत समारंभ आयोजित केला होता. याप्रसंगी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे याची प्रमुख उपस्थिती होती. गावडे यांनी प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांना शुभेच्छा देताना त्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाची शैक्षणिक, संशोधन व सांस्कृतिक क्षेत्रातील वाटचाल अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त केला.

डॉ हुजरे हे, १९९८  पासून प्राणीशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून नोकरीत आहेत.  राजे रामराव कॉलेज, जत येथे त्यांच्या सेवेची सुरुवात झाली. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राणीशास्त्र विषयातील ३५ शोध निबंध प्रसिध्द केले आहेत.  तसेच  चार आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्प्‍ यशस्वीपणे पूर्ण केले आहेत.   त्यांच्या मार्गदर्शनाखाली  सहाविद्यार्थ्यांनी  पीएचडी पदवी संपादन केली आहे. यापूर्वी त्यांनी प्राचार्य म्हणून पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील महाविद्यालय, तासगाव,  दत्ताजीराव कदम ए.एस.सी. कॉलेज, इचलकरंजी या शाखेवर  काम केले प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी महाविद्यालयाची समृद्ध परंपरा जपत गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन, विद्यार्थी विकास आणि समाजाभिमुख उपक्रमांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रो. (डॉ). सी. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापकपदी बढती झालेले डॉ.ए.एस.महात, डॉ. जी.के.सोनटक्के, डॉ. कैलास पाटील, डॉ. एस.एस. अंकुशराव, आणि डॉ. टी. सी. गौपाले यांचाही पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रो. (डॉ) एकनाथ आळवेकर यांनी आभार मानले. डॉ. सुप्रिया पाटील यांनी सूत्रसंचालन केले.  स्वामी विवेकानंद शिक्षक सेवकांच्या पतसंस्थेचे चेअरमन हितेंद्र साळुंखे, महाविद्यालयाचे प्रबंधक सचिन धनवडे, ज्युनिअर सायन्स्‍ विभागाचे प्रमुख प्रा. एम.आर.नवले व ज्युनिअर कॉलेज आर्टस कॉमर्स विभागप्रमुख प्रा.शिल्पा भोसले  उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes