Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिप पदाधिकाऱ्यांची कर्मचारी सोसायटीला भेट, कामकाजाचे केले कौतुक ! जिल्हा परिषदेची बुधवारी होणारी सर्वसाधारण सभा रद्दशिक्षक -पदवीधर मतदारसंघाचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, 23 ऑक्टोबरला मतदानपुणे पदवीधर- शिक्षकसाठी महायुतीतील पक्षांची वाटचाल स्वतंत्रपणे लढण्याकडे ! मंत्र्यांच्या विधानांनी मैत्रीपूर्ण लढतीचे चिन्हे अधिक !!कोल्हापुरात रंगणार ‘मराठी चित्रपटगीत महोत्सव, रसिकांसाठी प्रवेश विनामूल्यइंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनतर्फे गुरुवारी राज्यस्तरीय शिक्षक सन्मान सोहळापशुधनासाठी विमा योजना, पशुपालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याच्या प्रक्रियेला प्रारंभप्राधिकरणच्या सीईओंच्या कामकाजाची चौकशी करा,  आमदार राजेश क्षीरसागर यांचे मुख्य सचिवांना पत्रमहायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ 24 सप्टेंबरला ! आठ ऑक्टोबरला पॅनेलची घोषणा, अदृश्य शक्ती लुप्त झाली !!गोकुळच्या संचालक पदासाठी आमदारही मैदानात, अशोक माने यांचा अर्ज दाखल

जाहिरात

 

सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये ब्रेन बायपास शस्त्रक्रियेचे प्रात्यक्षिक, डॉ शिवशंकर मोरजक्केंचे विशेष कौतुक

schedule17 Jun 26 person by visibility 641 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे मेडिकल डायरेक्टर व जागतिक कीर्तीचे न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मारजक्के यांच्या नेतृत्वाखाली कणेरीमठ  येथे ब्रेन बायपास अर्थात मायक्रोव्हॅस्क्युलर ॲनास्टोमोसिस याविषयी संबंधी कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत ब्रेन बायपास शस्त्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या कार्यशाळेत देशातील विविध राज्यांमधून आलेल्या वीस न्यूरोसर्जन्ससह आफ्रिका खंडातील एका न्यूरोसर्जनने सहभाग नोंदविला.

न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया ही भारतातील न्यूरोसर्जनची   शिखर संघटना आहे. या संघटनेच्या सहकार्याने या कार्यशाळेचे आयोजन केले होते. ब्रेन बायपास अर्थात मायक्रोव्हॅस्क्युलर ॲनास्टोमोसिस ही न्यूरोसर्जरीतील सर्वात क्लिष्ट शस्त्रक्रिया आहे. आजवर ती फक्त महानगरांतील मोठ्या कॉर्पोरेट रुग्णालयांपुरती मर्यादित होती. डॉ. मारजक्के यांनी सिद्ध केले की, ही मर्यादा मोडून गावातील धर्मादाय रुग्णालयातही जागतिक दर्जाचे   सर्वात क्लिष्ट शस्त्रक्रिया  आणि प्रशिक्षण देता येते.

डॉ.  मारजक्के यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत बेंगळूर येथील डॉ. प्रा. द्वारकानाथ श्रीनिवास, मुंबई येथील डॉ. बटुक दियोरा यांच्यासह जागतिक कीर्तीचे न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मारजक्के यांनी भारतातील विविध भागांतील न्यूरोसर्जन आणि आफ्रिकेतील प्रतिनिधीला सिलिकॉन ट्यूब व धमनी मॉडेलवर ब्रेन बायपास शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण दिले.  प्रतिनिधींच्या प्रॅक्टिससाठी १८ न्यूरोसर्जरी मायक्रोस्कोप उपलब्ध करून देण्यात आले होते. प्रत्येकाला स्वतंत्र मायक्रोस्कोप दिला गेला.

ब्रेन बायपास म्हणजे एक मिलीमीटरपेक्षा कमी व्यासाच्या दोन धमन्या जोडून आजारी धमनीच्या पलीकडे रक्तप्रवाह वळवण्याची प्रक्रिया आहे. ही न्यूरोसर्जन मिळवू शकणाऱ्या सर्वोच्च कौशल्यांपैकी एक आहे. भारतात फार मोजके न्यूरोसर्जनच ही शस्त्रक्रिया नियमितपणे करतात. डॉ. मारजक्के आणि त्यांची टीम सध्या भारतात सर्वाधिक अशा शस्त्रक्रिया करत आहे. कार्यशाळेच्या समारोपानंतर पंधरा जून रोजी सहभागी न्यूरोसर्जन्ससाठी एक विशेष शैक्षणिक सत्र आयोजित करण्यात आले. यामध्ये मोया-मोया या दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या मेंदूतील रक्तवाहिन्यांच्या आजारावर करण्यात आलेल्या ब्रेन बायपास शस्त्रक्रियेचे थेट प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. परमपूज्य श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी डॉ. शिवशंकर मारजक्के, डॉ. प्रकाश भारमागौडर, डॉ. प्रतिमा मारजक्के, डॉ. अंकुश , राजू शिंदे  तसेच सिद्धगिरी हॉस्पिटलच्या डॉक्टर, नर्सिंग, तांत्रिक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes