Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महाविकास आघाडीला स्वाभिमानीची साथ ! सतेज पाटील, राजू शेट्टी, गणपतराव पाटील एकत्र !!राजारामपुरीतील रस्ते होणार चकाचक,दहा कोटीचा निधी मंजूर -आमदार राजेश क्षीरसागरडीवाय पाटील अभियांत्रिकीच्या दहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीखोल खंडोबा- शिपुगडे तालीम परिसरातील विकासकामांचे उद्घाटन76 जनावरे, रोज 300 लिटर दूध पुरवठा ! टाकळीवाडीच्या सुप्रिया चव्हाण ठरल्या सर्वोत्कृष्ट महिला दूध उत्पादककेआयटीच्या अभिग्यानमध्ये उलगडली कर्तबगारांच्या यशाची कहाणी जिप कर्मचारी सोसायटीतर्फे सभासदांच्या गुणवंत मुलांचा सत्कारडीवाय पाटील कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे यशपाटबंधारे विभागातील लिपीक राजाराम गंधवाले अपघातात ठार, देवदर्शन करुन येताना अपघातअभिमानने उंचावली वळसंगची मान, गावकऱ्यांनी काढली वाजतगाजत मिरवणूक

जाहिरात

 

डीवाय पाटील अभियांत्रिकीच्या दहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

schedule10 Nov 25 person by visibility 11 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कसबा बावडा येथील डी.वाय. पाटील स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या  १० विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली आहे. प्रत्येकी 40 ते 95 लाख किंमतीच्या ही प्रतिष्ठित शिष्यवृत्ती व फेलोशिप मिळवणाऱ्या १० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 

  या विद्यार्थ्यांनी युनायटेड किंगडम आणि ऑस्ट्रेलिया येथील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवला आहे. यामध्ये किरण कांबळे याला 95 लाख (युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न), गौरव जाधव याला 92 लाख (युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी), सिद्धांत बुचडे याला 92 लाख (युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी), तेजस्विनी गवळी हिला 91 लाख (युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी), वरद पवार याला 80 लाख (युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँड), श्रेय्या देसाई हिला 75 लाख (युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी), श्रुतिका पाटील हिला 75 लाख (ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी) तर पार्थ पाटील याला ४० लाख (युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहम-युनायटेड किंगडम) शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्याचबरोबर शिवानी यादव हिला 90 लाखांची (युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न) तर विकिराज  माने याला 85 लाखाची(युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी सिडनी) फेलोशिप मिळाली आहे. 

परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती व फेलोशिप मिळवणाऱ्या या विद्यार्थ्याचा सत्कार डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापिठाचे कुलगुरू व डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला.  डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी जागतिक स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे. 

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, आंतरराष्ट्रीय संबंध विभाग प्रमुख डॉ. सनी मोहिते,  आंतरराष्ट्रीय संबंध विभाग  सदस्य प्रा. गौरी म्हेतर, डॉ. कीर्ती महाजन, प्रा. तिलोत्तमा पाडळे आणि प्रा. शमिम भाई  आदी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना श्री महालक्ष्मी अकॅडमीचे अभय केळकर यांचे मार्गदर्शन लाभले. शिष्यवृत्ती व फेलोशिप मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील,  विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी अभिनंदन केले.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes