Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गांधीनगरमधील अनधिकृत बांधकामावरील कारवाईला स्थगिती देण्यास सर्किट बेंचचा नकारअजीम नवाज राही यांना रत्नाकर काव्य पुरस्कारकुलगुरू नियुक्तीला दिरंगाई, सिनेट सदस्यांचे राज्यपालाना पत्र ! लाठया खाऊ, जेलमध्ये जाऊ पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही ! नऊ जूनला कोल्हापुरात महामोर्चा !!डीवाय पाटील ज्युनिअर कॉलेजची महिमा शिर्के बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीयई-चलन संदर्भातील मागण्यांवर सरकार सकारात्मक, वाहतूकदारांना न्याय देण्यासाठी कार्यवाही - प्रताप सरनाईकउल्का महाजन, चिन्मयी सुमीत, प्रतिभा खैरनार, नितीन कोत्तापल्ले यांना दमसा सभेचे पुरस्कारहद्दवाढीवरुन महापालिका सभा तहकूब, गांधीनगरातील अतिक्रमण हटविण्यासाठी सभागृह आक्रमक चारचाकी वाहन सारले बाजूला…नगरसेवक सवार झाले इलेक्ट्रिक बाईक, सायकलवर !कृष्णराज महाडिक यांचा बार्शी - सोलापूर एसटी प्रवास

जाहिरात

 

कार डीलर्स असोसिएशनतर्फे क्रिकेट स्पर्धा, सोळा संघाचा सहभाग

schedule06 Apr 26 person by visibility 237 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशनच्या सहाव्या वर्धापन दिननिमित्त ‘केडीएल प्रीमियर लीग’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. सात ते नऊ  एप्रिल  २०२६ या कालावधीत शास्त्रीनगर मैदानावर सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सामने  होणार आहेत. या स्पर्धेत एकूण सोळा संघ सहभागी आहेत अशी माहिती संयोजकांनी दिली.

असोसिएशनचे दाऊद पठाण, राजेश घोरपडे, सुधाकर सासणे , महेश संकपाळ, फय्याज अथणीकर, इजाज नागरकट्टी यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली. स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष आहे. या स्पर्धेत कोल्हापूर शहर व उपनगरातील वाहन व्यवसाय आणि जुनी कार खरेदी विक्री करणाऱ्या सुमारे ५०० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. एकूण १६ संघ खेळतील. यामध्ये अण्णा मोटर्स, गवळी मोटर्स, ओम मोटर्स, साई व्हील्स, आय कार्स, युनिक कार्स, श्री मोटर्स, सोना कार्स, स्वामी मोटर्स, शिवानंद मोटर्स, डी मोटर्स, बाबा मोटर्स, प्रगती मोटर्स, एस एम मोटर्स, कोल्हापूर डीएसए आणि पांजरपोळ यांचा समावेश आहे.

स्पर्धेचा सांगता समारंभ आणि बक्षीस वितरण महापौर रूपाराणी निकम आणि उपमहापौर अक्षय जरग यांच्या प्रमुख उपस्थितीत ९ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता शास्त्रीनगर ग्राउंड येथे होणार आहे. विजेत्या संघाला चषक आणि अकरा हजार रुपये, दुसरे बक्षीस सात हजार रुपये आणि तिसरे बक्षीस पाच हजार रुपये देण्यात येणार आहे. सर्व संघांना किट देण्यात येणार असून उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट यष्टिरक्षक, मॅन ऑफ द मॅच अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. विजेत्या संघाला एक फिरता व एक कायमस्वरुपी  असे दोन चषक देण्यात येणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes