Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळमध्ये आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजराकोल्हापुरात डेप्युटी सीईओ, बीडीओसह २९ अधिकारी सामूहिक रजेवरलिंगायत माळी समाजाचे पुरस्कार जाहीर ! एस. एम. माळींना जीवनगौरव, अशोक राजाराम माळींना समाजभूषण पुरस्कार ! !दिव्यांग दिन ठरला अनोखा, अंध शिक्षिका दिपाली पाटीलला नियुकतीचे पत्रशाळा बंद आंदोलनातील शिक्षक – कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात : शिक्ष्ण संचालकांचा आदेशमतदार कोल्हापूरचे, नाव पुणे-बार्शीच्या मतदार यादीत, हा घोळ कधी सुधारणार ? : आदिल फरासांचा प्रशासनाला सवालमहापालिकेतील भ्रष्ट यंत्रणेचे राजेश क्षीरसागर हेच सूत्रधार – राजेश लाटकरांचा हल्लाबोलशिष्यवृत्ती परीक्षा 22 फेब्रुवारीला ! केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आठ फेब्रुवारीला !!मुकुंदराव पाटील पत्रकारिता -साहित्य पुरस्कर जाहीर ! विश्वास पाटील, रवींद्र गुरव, धनाजी घोरपडे, सचिन पाटलांचा समावेश ! !विद्यापीठातील विभागात पूजाअर्चा, विरोध केल्यानंतर प्रकुलगुरुंची दिलगिरी

जाहिरात

 

अमल महाडिकांवर अभिनंदनाचा वर्षाव ! आमदारांकडून त्या कार्यकर्त्यांचा पोशाख देऊन सन्मान !!

schedule26 Nov 24 person by visibility 2081 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नूत्न् आमदार अमल महाडिक यांच्या अभिनंदनासाठी नागाळा पार्क येथील भारती जनता पक्ष कार्यालयात मंगळवारी सकाळी गर्दी उसळली.  आ विविध क्षेत्रांतील मान्यवर,  तसंच भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांकडून अभिनंदनाचा वर्षाव झाला. दरम्यान आमदार महाडिक यांच्या  विजयासाठी अनवानी फिरण्याची प्रतिज्ञा केलेल्या चौघा कार्यकर्त्यांचाही  सत्कार करण्यात आला. 

‘अमल महाडिक हे विजयी झाल्यावरच पादत्राणे घालू, ” अशी प्रतिज्ञा या मतदारसंघातील साईनाथ मांडरेकर, सागर वाडकर, हर्षद कुसाळे, बिरू डावरे या चौघा कार्यकर्त्यांनी केली होती. आज या कार्यकर्त्यांचा आमदार अमल महाडिक यांनी पोशाख देऊन सत्कार केला. तसेच त्यांना पादत्राणंही दिली. कार्यकर्त्यांचं आपल्यावरील हे प्रेम पाहून आमदार महाडिक आणि गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक भारावून गेल्या.

 आमदार महाडिक यांनी  नागाळा पार्कातील पक्ष कार्यालयाला भेट दिली. तत्पूर्वी कोल्हापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण् करत अभिवादन केले.  पक्ष कार्यालयात सकाळी ९ ते दुपारी दोन या वेळेत त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी त नागरिकांकडून शुभेच्छा  स्विकारल्या.

ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, माजी नगरसेवक सतीश घोरपडे, विजय सूर्यवंशी, आशिष ढवळे, राजसिंह शेळके, चंद्रकांत घाटगे, अजित ठाणेकर,  विजय खाडे, प्रदीप उलपे, अमोल माने, किरण नकाते, माधुरी नकाते, महिला आघाडीच्या रुपाराणी निकम, संगीता खाडे, गायत्री राऊत, शिला पाटील, राजाराम कारखान्याचे संचालक तानाजी पाटील, संजय वास्कर,  जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चौगले, मारुती माने, वैभव माने, भाजपा ओबीसी सेलचे संतोष माळी, अशोक देसाई, संतोष लाड, सतीश धरपणकर, महादेव खानविलकर, पाचगाव येथील महेश पाटील, सागर दळवी, रामेश्वर पतकी, प्रमोद पवार, अभय तेंडुलकर  यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes