कूरमध्ये शनिवारी तृणधान्य महोत्सव- बाईक रॅली
schedule21 Mar 25 person by visibility 63 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : तृणधान्यांचे आहारातील महत्व याबाबत जनजागृतीसाठी भुदरगड तालुक्यातील कूर येथे 22 मार्च 2025 रोजी तृणधान्य महोत्सव आयोजित केले आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी दहा वाजता या महत्त्वाचे उद्घाटन होणार आहे. कृषी विभाग, कोल्हापूर यांच्यावतीने पौष्टिक तृणधान्य महोत्सव पौष्टिक तृणधान्य रॅली व ऊस पिक परिसंवाद कार्यक्रम होता आहे. जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी, ग्राहक तृणधान्यांचे संघ, विक्रेते, उद्योजक, अन्नप्रक्रिया उद्योजक तसेच शासकीय, निमशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी या कार्यक्रमामध्ये उ सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे व कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी केले आहे.
या महोत्सव अंतर्गत सकाळी नऊ वाजता कुर- दारवाड- म्हसवे- गारगोटी- कुर या मार्गावर मिलेट बाईक रॅली रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी दहा वाजता श्रीराम मंगल कार्यालय, गारगोटी- कोल्हापूर रोड, कूर येथे पौष्टिक तृणधान्य कार्यशाळा ऊस पिक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास सुरेश माने-पाटील, निवृत्त वरीष्ठ शास्त्रज्ञ व्ही.एस.आय.पुणे, डॉ.योगेश बन प्रकल्प प्रमुख व पिक पैदासकार, मिलिंद पाटील, प्रगतशील मिलेट उत्पादक शेतकरी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
महोत्सवाच्या निमित्ताने पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले असुन या कार्यक्रमाचे औचित्य साधुन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतील व कृषी यांत्रिकीकरण योजनेतील ट्रॅक्टर, पॉवर टिलर, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या बाबीचा लाभ मिळणा-या शेतकरी लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्यात येणार आहे. कार्यक्रम स्थळी पौष्टिक तृणधान्याच्या प्रक्रिया उत्पादनांचे स्टॉल विक्रीचे नियोजन करण्यात आले आहे.