सीपीआमधील आरोग्य सुविधासंबंधी भाजपा सतर्क ! अधिष्ठाताची घेतली भेट!!
schedule02 Jul 24 person by visibility 351 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : सीपीआरमधील ईएनटी शस्त्रक्रिया विभागाचे रखडलेले नूतनीकरण काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने सीपीआर अधिष्ठाता डॉ एस.एस मोरे यांच्याकडे केली. त्यांना मागण्यांच निवेदन सादर केले. बांधकाम विभागाचे अधिकारी आशिष पाटील, वैद्यकीय अधीक्षक शिशिर मिरगुंडे, डॉ. अजित लोकरे उपस्थित होते. त्यांच्याकडे प्रलंबित कामाविषयी विचारणा केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, रूग्णांना नवंसंजीवनी असणाऱ्या रुग्णालयात ऑपरेशन थिएटरच बंद असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच शस्त्रक्रिया करायची आहे पण थिएटरच बंद असल्यामुळे अनेक रुग्णांना दुखणे अंगावर काढावे लागत आहे. त्यामुळे ऑपरेशन थिएटर वेळेत सुरू न होण्याला जबाबदार कोण असा सवाल जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केला. तसेच ईएनटी विभागाचे ऑपरेशन थिएटर लवकरात लवकर सुरू करून रुग्णांना दिलासा द्यावा अन्यथा भाजपा याविषयी तीव्र आंदोलन करेल.
यावेळी भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव यांनीही आरोग्य सवे संदर्भात सूचना केल्या. बांधकाम विभागाचे अधिकारी आशिष पाटील यांना ईएनटी विभागाचे नुतनीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे अशा सूचना यावेळी केल्या.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, विजयसिंह खाडे-पाटील, किरण नकाते, सुरज सनदे यांनी अन्य सीपीआर रुग्णालयातील चालू असलेल्या गैरकारभारा बाबत तक्रारी निदर्शनास आणून दिल्या.
सरचिटणीस गायत्री राऊत, डॉ सदानंद राजवर्धन, राजू मोरे, विराज चिखलीकर, गणेश देसाई, माधुरी नकाते, भरत काळे, रोहित पवार, दिग्विजय कालेकर, अमर साठे, मंगला निपाणीकर, प्रदीप उलपे, गिरीश साळोखे, अनिल कामत, प्रग्नेश हमलाई, सयाजी आळवेकर, अशोक लोहार, सतीश आंबर्डेकर, धीरज पाटील, रविकिरण गवळी, डॉ कौस्तुभ वाईकर, डॉ शिवानंद पाटील, सचिन पोवार, विश्वास जाधव, दिलीप बोंद्रे, बंकट सूर्यवंशी, प्रसाद पाटोळे, श्वेता गायकवाड, प्रणोती पाटील, शोभा कोळी उपस्थित होते.