कार्यकर्त्यांच्या मेहनतीने काँग्रेसमुक्त कोल्हापूर करण्यात भाजपला यश-नाथाजी पाटील
schedule26 Nov 24 person by visibility 412 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व च्या सर्व जागा जिंकण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे .त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस भुईसपाट झाली .भाजप मुक्त कोल्हापूर जिल्हा करणार अशी कोल्हेकुई करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना ही मोठी चपराक आहे .कोल्हापूर जिल्हा काँग्रेसमुक्त झाला.’असे मत भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी व्यक्त केले.
. भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष यांच्या बैठकीत ते बोलत होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबई येथे सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक घेतली व सर्व जिल्हाध्यक्षांचे अभिनंदन केले. दरम्यान भाजपच्या तालुकाध्यक्षांची बैठक मंगळवारी, कोल्हापूर जिल्हा कार्यालयामध्ये पार पडली.
पाटील म्हणाले, ‘ कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर, त्यांच्या पाठबळावर ,आणि त्यांनी केलेल्या अपार कष्टावर महायुतीचे सर्वच उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले आहेत . त्यामुळे भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच असून भविष्यकाळातील नगरपालिका जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूक सामोरे जाण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच तयारी करावी.’
.यावेळी जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा, सुशीला पाटील, प्रमोद कांबळे, महेश चौगुले, डॉ .सुभाष जाधव, राजेंद्र तराळे,संभाजी आरडे, दत्ता मेडशिंगे, विलास रणदिवे, नामदेव चौगुले, एकनाथ पाटील, प्रीतम कापसे ,संतोष तेली, शिवनगेक, मंदार परितकर, स्वप्निल शिंदे, अनिल पंढरे तालुकाध्यक्ष उपस्थित होते, डॉ. आनंद गुरव यांनी प्रास्ताविक केले, प्रकाश पाटील यांनी आभार मानले.