स्थायी समितीत महायुतीचा जय हो, सभापतीपदी भाजपचे विशाल शिराळे!
schedule11 Mar 26 person by visibility 48 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विशाल शिराळे यांची निवड झाली. अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या सदस्यांची बुधवारी 11 मार्च 2026 रोजी बैठक झाली. स्थायी समितीत महायुतीकडे नऊ इतके संख्याबळ आहे तर विरोधी काँग्रेस आघाडीकडे सात इतके संख्याबळ आहे. स्थायी समिती सभापती पदासाठी महायुतीकडून भाजपचे नगरसेवक विशाल किरण शिराळे यांचा अर्ज दाखल होता तर काँग्रेस आघाडीकडून नगरसेवक अमर समर्थ यांनी अर्ज भरला होता. या निवडीत शिराळे यांनी बाजी मारली. शिराळे यांना नवतर अमर समर्थना सात इतके मतदान झाले. स्थायीच्या सभापतीपदी शिराळ यांचे निवड झाल्याचे घोषित होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली.