Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
प्रा. आनंद गिरी, आझाद नायकवडी, दीपक बिडकर यांना राज्य सरकारचे पुरस्कारस्थानिकच्या निवडणुकीवरुन सुप्रीमच्या निर्णयाचे नगरसेवकांतून स्वागत, आरक्षण मर्यादेवरुन अधिक स्पष्टतेचीही गरजकोल्हापूर जिल्ह्यात पाच डिसेंबरला शाळा बंद आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चामहापालिका, जिल्हा परिषदेच्याही निवडणुका होणार – सुप्रीम कोर्टाचा आदेशकृषी प्रदर्शनात गोकुळचा स्टॉल ! दुग्धजन्य पदार्थ, आयुर्वेदिक उत्पादने - वैरण बँक ! !शां.कृ. पंत वालावलकर हायस्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव दिमाखातहॉटेलमधील मेन्यूकार्डप्रमाणे दिव्यांग प्रमाणपत्रासाठी सीपीआरमध्ये दर, दोन्ही मंत्र्यांनी रॅकेट उद्धवस्त करावे – शिवसेना उपनेते संजय पवारप्राध्यापक निलंबित, प्रभारी प्राचार्यांवर अॅक्शन कधी ?कार्यालयीन वेळेत शहर अभियंता गैरहजर, आयुक्तांकडून पगार कपात ! १९ कर्मचाऱ्यांवरही कारवाई! !प्रा. डॉ. आनंद पाटील यांचा चार डिसेंबरला नागरी सत्कार, २१०० पानांच्या तीन खंडांचे प्रकाशन

जाहिरात

 

प्रा. आनंद गिरी, आझाद नायकवडी, दीपक बिडकर यांना राज्य सरकारचे पुरस्कार

schedule28 Nov 25 person by visibility 62 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी 28 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आली. या पुरस्कार यादीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील प्रा. आनंद गिरी , शाहीर आझाद नायकवडी, नृत्यदिग्दर्शक दीपक बिडकर यांचा समावेश आहे.  कलेच्या विविध क्षेत्रात प्रतिवर्षी नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, मराठी चित्रपट, कीर्तन/समाजप्रबोधन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन, कलादान, प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक, लोकनृत्य, लावणी/संगीतबारी,भारुड/विधीनाटय, वाद्यनिर्मिती, झाडीपटटी, खडीगंमत, दशावतार, नमन खेळे, वहीगायन, दुर्मिळ प्रयोगात्मक कला, प्रयोगात्मक कलेशी संबधित संस्था, ध्वनीतंत्रज्ञ, संगीत संयोजन, व्हाईस ओव्हर या क्षेत्रांमध्ये ज्या कलाकारांनी प्रदीर्घ काळ सेवा केलेली आहे, अशा कलावंताना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.

ज्येष्ठ पुरस्कार तीन लाख रुपये, युवा पुरस्कार एक लाख रुपये, मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. हे सर्व पुरस्कार लवकरच मुंबई येथे सर्व कलाकारांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कारर्थींची नावे पुढील प्रमाणे. ज्येष्ठ पुरस्कार  :नाटक - अरुण कदम (2025), कंठसंगीत - धनंजय जोशी (2025), वाद्यसंगीत - विजय चव्हाण (2025), मराठी चित्रपट - शिवाजी लोटन पाटील (2025), उपशास्त्रीय संगीत- उदय भवाळकर (2025), किर्तन/समाजप्रबोधन- गहिनीनाथ ज्ञानेश्वर औसेकर महाराज (2025), तमाशा- कोंडीराम आवळे (2025), शाहिरी- शाहिर मधुकर मोरे (2025), नृत्य- श्रीमती रंजना फडके (2025), लोककला- हरिभाऊ वेरुळकर (2025), आदिवासी गिरीजन - रायसिंग हिरा पाडवी (2025), कलादान- चंद्रकांत घरोटे (2025), प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार- प्रा. आनंद गिरी (2024), संजीव भागवत (2025), लोकनृत्य- सुभाष नकाशे (2024), अरविंद राजपूत (2025), लावणी संगीतबारी- श्रीमती शकुंतला नगरकर (2024), श्रीमती कल्पना जावळीकर ( 2025), भारुड/विधीनाट्य/गौळण- श्रीमती पदमजा कुलकर्णी (2024), श्रीमती गोदावरी मुंडे (2025), वाद्यनिर्मिती करणारे कलाकार- युसुफ घडूलाल मुल्ला (2024), भालेराव नागोराव दडांजे (2025), झाडीपट्टी/दंडार/खडीगंमत- रामदास चौधरी (2024), बुधा भलावी (2025), दशावतार/नमन खेळ/वहीगायन- ओमप्रकाश यशवंत चव्हाण (2024), भानुदास शंभा सावंत (2025), दुर्मिळ प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जपणारे व त्यांचे जतन, संवर्धन करणाऱ्या व्यक्ती/संस्था- धर्मा कांबळे (2024), श्रीमती साखराबाई टेकाळे (2025), प्रयोगात्मक कलेशी संबंधित संग्रहालय/संस्था- विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरीटेबल ट्रस्ट (2025), तांबवेश्वर शाहिरी कलापथक (तुकाराम ठोंबरे), बीड (2024), ध्वनीतंत्रज्ञ संकलक/पुरस्कार- अविनाश ओक (2024), महेश अंबेरकर (2025), संगीत संयोजन- अमर हळदीपूर (2024), कमलेश भडकमकर (2025), व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट/निवेदन- अंबरीश मिश्र (2024), उदय सबनीस (2025)

युवा पुरस्कार  :- नाटक - तेजश्री प्रधान (2024), भूषण कडू (2025), कंठसंगीत- धनंजय म्हसकर (2024), मयुर सुकाळे (2025), वाद्यसंगीत- ऋषिकेश जगताप (2024), वरद कठापूरकर (2025), मराठी चित्रपट- मधुरा वेलणकर (2024), शंतनु रोडे (2025), उपशास्त्रीय संगीत- राहुल देशपांडे (2024), भाग्येश मराठे (2025), किर्तन/समाजप्रबोधन- जयवंत बोधले (2024), ज्ञानेश्वर माऊली कदम ( 2025), तमाशा- नितीन बनसोडे (2024), अमृता थोरात (2025) शाहिरी- शाहिर आझाद नाईकवडी (2024) शाहिरा अनिता खरात (2025), नृत्य- वृषाली दाबके (2024), संतोष भांगरे (2025), लोककला- संदिप पाल महाराज (2024), चेतन बेले (2025), आदिवासी गिरीजन- साबूलाल बाबूलाल दहिकर (2024), गंगुबाई चांगो भगत (2025) कलादान- श्रीमती कस्तुरी देशपांडे (2024), सिध्देश कलिंगण (2025), प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार- खंडुराज गायकवाड (2024), तेजस्विनी आचरेकर (2025), लोकनृत्य- दिपक बीडकर (2024), गणेश कांबळे (2025), लावणी संगीतबारी- प्रमिला लोदगेकर ( 2024), वैशाली वाफळेकर (2025), भारुड/विधीनाट्य/गौळण- हमीद सय्यद (2024), रामानंद उगले (2025), वाद्यनिर्मिती करणारे कलाकार- उमा शंकर दाते (2024), सर्वजीत विष्णू पोळ (2025), झाडीपट्टी/दंडार/खडीगंमत- मुकेश देशमुख (2024), दुधराम परसराम कावळे (2025), दशावतार/नमन खेळ/वहीगायन- लक्ष्मीकांत नाईक (2024), रामकृष्ण कैलास घुळे (2025), दुर्मिल प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जपणारे व त्यांचे जतन, संवर्धन करणाऱ्या व्यक्ती/संस्था- रेणुका शेंडगे जेजूरीकर (2024), प्रसाद गरुड (2025), प्रयोगात्मक कलेशी संबंधित संग्रहालय/संस्था- सव्यसाची गुरुकुलम लखन जाधव (2024), इतिहासाचे अबोल साक्षिदार बहुउद्देशिय ट्रस्ट (निलेश सकट) (2025), ध्वनीतंत्रज्ञ संकलक/पुरस्कार- प्रणाम पानसरे (2024), विराज भोसले (2025), संगीत संयोजन- अनुराग गोडबोले (2024), अमित पाध्ये (2025), व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट/निवेदन- मेघना एरंडे (2024), समिरा गुजर (2025).

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes