अजय पवार नवे अपर जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाणांची बदली
schedule23 Jun 26 person by visibility 128 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : राज्य सरकारच्या महसूल व वन विभागातर्फे उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये हेमंत पुंडलिक निकम यांची जिल्हा पुनवर्सन अधिकारी, कोल्हापूर या पदावर नियुक्ती करण्यात आली. जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी हिरानाथ चव्हाण यांची बदली उप जिल्हा निवडणूक अधिकारी या पदावर झाली. चव्हाण यांनी यापूर्वी भुदरगड तहसिलदारपदी काम केले आहे. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मुंबई येथील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय उत्तम पवार यांची अपर जिल्हाधिकारी कोल्हापूर या पदावर बदली झाली. महसूल व वन विभागातर्फे मंगळवारी, २३जून २०२६ रोजी बदलीचे आदेश निघाले. उपसचिव महेश वरुडकर यांच्या सहीनिशी नवीन बदलीचे आदेश निघाले आहेत.