+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustअजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची यादी, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटलांचा समावेश adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश adjust कोल्हापुरात काँग्रेसचा सरप्राइज चेहरा कोण ? आज उत्तर मिळणार ! adjust शिवसेनेकडून आमदार प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरकेंना उमेदवारी adjustदक्षिणमध्ये पाटील, महाडिकांनी घेतले अर्ज ! उत्तरसाठी अर्ज घेणाऱ्यांत व्ही.बी, सत्यजित कदम यांची नावे !! adjustदूध उत्पादकांसाठी खुशखबर, गोकुळतर्फे नवीन ४००० बायोगॅस मंजूर ! चेअरमन अरुण डोंगळे adjustप्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांंना ३५ हजार रुपयांचा दंड, ३०० किलो प्लॅस्टिक जप्त adjustराहुल आवाडे गुरुवारी अर्ज भरणार adjust कोल्हापुरात बाइकस्वारांची धूम
1001157259
1001130166
1000995296
schedule12 Oct 24 person by visibility 82 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
टिपऱ्याचा मधुर आवाजाने उत्साहाला आलेली भरती त्यात ढोली तारा ढोल बाजेच्या तालावर आंबेमातेच्या गजरात शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयामध्ये दांडिया स्पर्धा पार पडली. जल्लोष, उत्साह, मनसोक्त दाद, दांडियाच्या तालावर थिरकणारे प्रेक्षक अशा भारावलेल्या आणि धमाल वातावरणात महाविद्यालयाच्या प्रांगणात ही स्पर्धा झाली.
 स्पर्धेसाठी महाविद्यालयातील एकूण चौदा संघानी नोंदणी केली होती. त्यापैकी दुर्गामाता ग्रुप यांना प्रथम, रॉयल आय.टी. गर्ल्स द्वितीय आणि राधाकृष्ण ग्रुपला तृतीय क्रमांक मिळाला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालायचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी मार्गदर्शन केले. लेखक, दिग्दर्शक युवराज डवरी व विजय वाइंगडे यांनी परीक्षक म्हणून काम पहिले.
आपल्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थिनींच्या कला गुणांना वाव देणाऱ्या स्पर्धा आपण सतत घेत असतो. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासास मदत होते. विद्यार्थिनींना गुणवत्तापूर्वक शिक्षण आणि व्यक्तिमत्व विकासाचे धडे मिळतील, असे मत प्राचार्य प्रशांत पालकर यांनी याप्रसंगी व्यक्त केले. 
कार्यक्रमाचे उदघाटन उपप्राचार्य प्रा. सागर शेटगे यांच्या हस्ते झाले. या दांडिया महोत्सवाचे समन्वयन प्रा. अश्विनी कांबळे यांनी पाहिले. स्नेहा मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. विनायक पाटील यांनी  आभार मानले.  यावेळी प्रा. वैभव कुंभार उपस्थित होते