कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे मंगळवारी कार्यशाळा
schedule15 Jun 25 person by visibility 39 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्यावतीने मंगळवारी (१७ जून २०२५) व्यावसायिक कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कोल्हापूर सराफ व्यापारी संघ व आयआयजेएसच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही कार्यशाळा हॉटेल झोरबा येथे सायंकाळी सात वाजता होईल. या कार्यशाळेमध्ये ३० जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत मुंबई येथे होणाऱ्या प्रदर्शनासंबंधी नाहीद सुनके माहिती देतील. यावेळी नोंदणीही केली जाईल. मिथिलेश पांडे हे व्यावसायिक संधींवर मार्गदर्शन करतील. यामध्ये व्यवसाय वाढ, ग्राहकांची आवड निवड, भाववाढीतून व्यवसाय, जाहिरात, भांडवल कसे उभे करायचे, इम्पोर्ट-एक्स्पोर्टद्वारे व्यवसाय वाढविणे आदी गोष्टींवर मार्गदर्शन करणार आहेत. डायमंड उद्योगावर इंडियन नॅचरल डायमंड रिटेलर अलायन्सचे मुलरी मार्गदर्शन करणार आहेत. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने या कार्यशाळेला सराफ व्यावसायिक व सुवर्णकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष राजेश राठोड, उपाध्यक्ष विजय हावळ, सचिव शिवाजी पाटील, प्रीतम ओसवाल यांनी केले आहे.