कागलमध्ये होणार नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय ! मुश्रीफांचा पाठपुरावा,मंत्रीमंडळाची मंजुरी !!
schedule07 Aug 24 person by visibility 460 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कागल येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित १०० रुग्णखाटांच्या आयुर्वेद रुग्णालयास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी मुश्रीफ यांनी पाठपुरावा केल्याचे म्हटले आहे.
केंद्र शासनाच्या व भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग नवी दिल्ली यांच्या मान्यतेच्या अधीन राहून कागल येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्न १०० रुग्णखाटांचे आयुर्वेद रुग्णालय स्थापन करण्यास शासनाने मान्यता देण्यात आली असल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
महसूल विभागाच्या सहमतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निकषानुसार आवश्यक जागा उपलब्ध करुन घेण्यात येऊन त्या जागेत नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
या महाविद्यालयासाठी विविध संवर्गातील पदे अंदाजपत्रकीय तरतूद करुन विहित मार्गाने निर्माण करण्यास व भरण्यास परवानगी देण्यात आली. तसेच या महाविद्यालयांशी संलग्नित अनुषंगिक आयुर्वेद रुग्णालयासाठी विविध संवर्गातील पदे अंदाजपत्रकीय तरतूद करुन विहित मार्गाने निर्माण करण्यास व भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. या महाविद्यालय व अनुषंगिक रुग्णालयांसाठी आवश्यक तसेच अतिरिक्त बांधकाम करण्यास व खर्चा
****