Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
संजय शिंदेंच्या कोल्हापुरातील दीर्घकालीन पदस्थापनेची उच्चस्तरीय चौकशी करावी - प्रकाश बेलवाडेप्राधिकरणाच्या विशेष दर्जाचा हद्दवाढीवर परिणाम नाही, २०२७ च्या जनगणनेनंतर हद्दवाढ अटळच : राजेश क्षीरसागरइंधन बचत हीच राष्ट्रसेवा…शिक्षण समिती सभापती, शिक्षणाधिकाऱ्यांचा बसमधून प्रवासशिवाजी विद्यापीठाचे नवीन कुलगुरु कोण ? कुलपती कार्यालयाकडे नजरा राज्यातील पंचवीस बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ! सुनील फुलारींची ठाण्यात बदली, रंजन शर्मा कोल्हापूरचे नवे आयजी!!उष्णतेची तीव्र लाट येऊन मान्सूनमध्ये व्यत्यय येऊ शकतो :  शास्त्रज्ञ डॉ. अनिल कुलकर्णीऋतूपूर्ण - प्रियांका कांबळे विवाह सोहळा थाटातसन्मान वारशाचा - पुनर्भेट नात्यांची ! केआयटीच्या प्रगतीसाठी दिल्लीत एकवटले माजी विद्यार्थी !!इंधन बचतीचा फंडा…जिप अध्यक्षांचा प्रवास बसमधून, उपाध्यक्ष - सभापती ई बाईकवरुन ! अधिकारी सायकलवर!!नोटिसा काढून अतिक्रमणधारकांना संरक्षण - माजी नगरसेवक संघटनेचा आरोप

जाहिरात

 

संजय शिंदेंच्या कोल्हापुरातील दीर्घकालीन पदस्थापनेची उच्चस्तरीय चौकशी करावी - प्रकाश बेलवाडे

schedule16 May 26 person by visibility 8 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या बदली, पुनर्नियुक्ती आणि कोल्हापूरमधील दीर्घकालीन पदस्थापनेची उच्चस्तरीय चौकशी करावी,’ अशी मागणी गर्जना संघटनेचे प्रकाश बेलवाडे यांनी केली आहे. ०२ एप्रिल २०२६ रोजी सरकारने त्यांची कोल्हापूर येथून बदली करून कार्यमुक्ती केली होती. त्यानंतर  १५ मे २०२६ रोजी “नियुक्तीच्या प्रतीक्षेत” या स्थितीतून पुन्हा कोल्हापूर येथेच अपर जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली. या दोन्ही सरकारी आदेशांमध्ये विसंगती असून ही प्रक्रिया महाराष्ट्र सरकारी कर्मचारी बदल्यांचे विनियमन अधिनियम २००५ च्या विरोधात असल्याचा संशय निर्माण झाला आहे असे बेलवाडे यांनी म्हटले आहे. एकाच जिल्ह्यात दीर्घकालीन पदस्थापना कशी झाली? बदलीनंतर पुन्हा त्याच जिल्ह्यात पुनर्नियुक्ती कोणाच्या दबावाखाली करण्यात आली? नियुक्तीच्या प्रतीक्षेतील अधिकाऱ्याला पुन्हा त्याच संवेदनशील पदावर कशाच्या आधारे बसविण्यात आले? सरकारी आदेशांमध्ये पारदर्शकता का ठेवण्यात आली नाही? या सर्व बाबींची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गर्जना संघटनेने केली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीश किंवा वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांमार्फत करून संपूर्ण अहवाल सार्वजनिक करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. माहिती अधिकारातून प्राप्त कागदपत्रांनुसार संजय शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल १५ पैकी १० वर्षांहून अधिक काळ विविध पदांवर सेवा बजावली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी अशा महत्त्वाच्या पदांवर त्यांची सातत्याने नियुक्ती करण्यात आली होती याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes