+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustअजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची यादी, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटलांचा समावेश adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश adjust कोल्हापुरात काँग्रेसचा सरप्राइज चेहरा कोण ? आज उत्तर मिळणार ! adjust शिवसेनेकडून आमदार प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरकेंना उमेदवारी adjustदक्षिणमध्ये पाटील, महाडिकांनी घेतले अर्ज ! उत्तरसाठी अर्ज घेणाऱ्यांत व्ही.बी, सत्यजित कदम यांची नावे !! adjustदूध उत्पादकांसाठी खुशखबर, गोकुळतर्फे नवीन ४००० बायोगॅस मंजूर ! चेअरमन अरुण डोंगळे adjustप्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांंना ३५ हजार रुपयांचा दंड, ३०० किलो प्लॅस्टिक जप्त adjustराहुल आवाडे गुरुवारी अर्ज भरणार adjust कोल्हापुरात बाइकस्वारांची धूम
1001157259
1001130166
1000995296
schedule22 Sep 24 person by visibility 178 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
कोल्हापूरचं जागृत देवस्थान असलेल्या त्र्यंबोली देवीचे मंदिर आणि परिसर सुशोभित व्हावा. भाविकांना विविध सेवासुविधा मिळण्याबरोबरच पर्यटनदृष्टया हे स्थळ विकसित व्हावे, या हेतूने प्रादेशिक पर्यटन विभागाकडून त्र्यंबोली मंदिर सुशोभिकरणासाठी १ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र मंदिर परिसराच्या संपूर्ण सुशोभिकरणासाठी एकूण १० कोटी रूपयांचा आराखडा बनवला असून, तो मंजूर करण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. 
 त्र्यंबोली देवी मंदिर परिसराच्या सुशोभिकरणाच्या कामाचा आज शुभारंभ झाला, त्या प्रसंगी ते बोलत होते.
माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी केलेल्या पाठपुराव्यातून कोल्हापूरच्या ऐतिहासिक त्र्यंबोली देवीच्या मंदिर परिसराच्या सुशोभिकरणासाठी प्रादेशिक पर्यटन विभागाकडून १ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून मंदिर सुशोभिकरणाच्या कामाला सुरूवात झाली.  माजी आमदार अमल महाडिक, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्यजित कदम यांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ झाला. या देवस्थानच्या सुशोभिकरणासाठी क वर्ग दर्जा मिळणे गरजेचे होते. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठराव करून, आपण त्र्यंबोली मंदिराला क वर्ग दर्जा मिळवून दिला आहे. त्यामुळे इथून पुढे दरवर्षी या मंदिराच्या सुशोभिकरणासाठी विकास निधी मिळणार असल्याची माहिती सत्यजित कदम यांनी दिली. 
 दक्षिण विधानसभा मतदार संघातील अनेक तीर्थस्थळं आणि देवस्थान सुशोभित करण्याचे आपले ध्येय आहे. त्यादृष्टीने आपले प्रयत्न सुरू असल्याचे माजी आमदार अमल महाडिक यांनी सांगितले. महापालिकेचे माजी सभापती विजय सुर्यवंशी यांनीही मनोगत व्यक्त केले. या निधीतून मंदिर परिसरातील वरच्या बाजूचे कॉंक्रीटीकरण करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी भाजप महानगर अध्यक्ष विजय जाधव,  माजी महापौर दिपक जाधव, माजी नगरसेवक आशिष ढवळे, प्रकाश काटे, रवींद्र मुतगी,वैभव माने, राजसिंह शेळके, सीमा कदम. देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे उपस्थित होते.