Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
नूतन मराठी विद्यालयमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव पारितोषिक वितरण समारंभसरोजिनी कॉलेज – अॅस्टर आधारमध्ये सामंजस्य करार, नर्सिंग कोर्स सुरू होणार त्यांना पद दिलं, महापौर केलं ! माझं काय चुकले ? सतेज पाटलांच्या निशाण्यावर आजरेकरनेते मंडळी म्हणतात, निवडणूक ताकतीने लढू अन् जिंकू !केएमटीचे १५६ कर्मचारी सेवेत कायम, राजेश क्षीरसागरांचा पाठपुरावा ! कर्मचाऱ्यांचा शिवालयावर जल्लोष ! !राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे उमेदवारी मागणी अर्जास प्रारंभकोल्हापुरात शुक्रवारी एमएसएमई कॅपॅसिटी बिल्डिंग समिट २०२५-२६जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ, महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार ! धनंजय महाडिककोल्हापूर-इचलकरंजी महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान ! 16 जानेवरीला मतमोजणी ! !चिकोडे ग्रंथालयात 860 रक्तदात्यांनी केले रक्तदान

जाहिरात

 

मित्रानेच केला मित्राचा खून, घोडागाडी शर्यतीतून घडला प्रकार

schedule04 Jul 24 person by visibility 976 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: इचलकरंजी शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सरोजनी नायडू विद्यालयाच्या परिसरात सुशांत दीपक कांबळे ( वय १८, रा .आसरानगर इचलकरंजी) याचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. घोडागाडी शर्यतीच्या कारणावरून मित्रानेच मित्राचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
 शहापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जलद गतीने हालचाल करत तिघा संशयीतांना कोल्हापुरातील राजाराम कॉलेजच्या मैदानावर अटक केली. अतिश उर्फ टक्या दत्तात्रय नेटके (वय १९ रा.गणेश नगर इचलकरंजी), प्रदीप उर्फ बाळू पारस यादव (२० रा जे.के. नगर शहापूर ), अर्जुन सरदार चव्हाण (२१ रा. गणेश नगर इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी तपासाची माहिती दिली.
 गुरुवारी सकाळी साडेसात वाजता नायडू विद्यालयच्या मैदानावर एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शहापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस घटनास्थळी आले. त्या ठिकाणी सुशांत दीपक कांबळे यांच्या तोंड पाठ व मांडीवर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याची माहिती पुढे आली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, शेष मोरे तर शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी, उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील संशयीतांना शोधण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी संशितांचा शोध घेण्यास सुरुवात केली. 
कोल्हापुरातील राजाराम कॉलेज इमारतीच्या मागील मैदानावर संशयित बसले आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मैदानावर छापा टाकून अतिश नेटके, अर्जुन चव्हाण, प्रदीप यादव यांना ताब्यात घेतले .तिघांनीही खुनाची कबुली दिली. सुशांत कांबळे आणि संशयित आशिष नेटके हे मित्र आहेत. त्यांच्यामध्ये घोडागाडी शर्यतीची आणि शर्यतीतील घोडा गाडी परत मागण्याच्या कारणावरून वाद झाला होता. काल 3 जुलै रोजी सुशांत कांबळे नायडू विद्यालयाजवळ उभा होता. त्या ठिकाणी अतिश नेटके, अर्जुन चव्हाण आणि बाळू यादव आले. 
तिघांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करत खून केल्याची कबुली दिली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश खाटमोडे पाटील, पोलीस उपाधीक्षक समरजीत सिंह साळवे ,स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमक,र शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर, संदीप जाधव शेष मोरे, सहाय्यक फौजदार खंडेराव कोळी, प्रकाश पाटील, प्रशांत कांबळे ,सागर चौगुले, संजय कुंभार, महेश खोत ,चालक राजेंद्र परांडेकर, शहापूर पोलीस ठाण्याचे साजिद कुरणे, प्रमोद मोहिते, अर्जुन कराल यांनी तपासात भाग घेतला होता.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes