भारतीय मजदूर संघाचा ६९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
schedule26 Jul 24 person by visibility 595 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : भारतीय मजदूर संघाचा ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त २३ जुलै रोजी कामगार मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यासाठी महाराष्ट्र प्रदेश सचिव ॲड विशाल मोहिते पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी भारतीय मजदूर संघाच्या स्थापनेपासूनची वाटचाल विषद केली. भारतीय मजदूर संघाची स्थापना दत्तोपंत ठेंगडी यांनी केल्याचे सांगून गेल्या ७० वर्षात कामगार वर्गाच्या उन्नतीसाठी प्रामाणिकपणे झटणारी व कामगार वर्गास परमेश्वर म्हणून कार्यरत असणारी एकमेव संघटना म्हणून नावारूपाला आली.असे पाटील यांनी नमूद केले. पुढील काळात भारतीय मजदूर संघाचे कार्य गावागावात पोहचविणे गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष एस. एन. पाटील होते. अनुजा धरणगावकर यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा सचिव प्रविण जाधव यांनी सूत्रसंचालन केले. मुकुंद जोशी, भगवान खाडे , शिवाजी चौगुले, अमॄत लोहार, रमेश थोरात, संदीप पाटील , अमर लोहार, राहूल भालबर व जिल्हा कार्यकारिणी उपस्थित होते.