Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चंद्रकांत चषक  फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळ, शिवाजी तरुण मंडळ विजयीपरवानी फी दरवाढ मागे घेण्याबाबत आयुक्तांशी चर्चा करू-अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडेराजकारण्यांच्यापेक्षा लोकांसाठी झटणारी समाजरत्ने समाजासमोर झळकली पाहिजेत-प्रकाश आबिटकरमॅनेजमेंटसाठी पाच अर्ज वैध, भाटियांचा अर्ज अवैध ! हंगेरगीकरांच्या उमेदवारीला सुटाचा आक्षेप !कर्करोग उपचारांसाठी चुंबकीय नॅनो कणांच्या निर्मितीसाठी पेटंट ! सरकारने गरिबांच्या शिक्षणाचे दायित्व निभवावे- पुरोगामीचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटीलप्रा. दत्ता जाधव यांना पीएचडीराष्ट्रीय स्तरावरील हँडबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाची दमदार कामगिरीव्यवसाय परवाना दरवाढीला व्यावसायिकांचा विरोध ! महापालिका अन् चेंबर ऑफ कॉमर्स आमनेसामने !!बुधवारपासून चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा, सर्वाधिक बक्षीसाची स्पर्धा

जाहिरात

 

५० लाख व्हिजिटर्सचा टप्पा

schedule28 Feb 24 person by visibility 920 categoryसंपादकीय

महाराष्ट्र न्यूज वन  : अचूक आणि वस्तुनिष्ठ बातम्या, दर्जेदार लेखन, वैविध्यपूर्ण विषयांची हाताळणी आणि कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणारं प्रभावी माध्यम म्हणजे, ‘महाराष्ट्र न्यूज वन’!. या न्यूज पोर्टलने अवघ्या साडेतीन वर्षाच्या कालावधीत ५० लाख व्हिजिटर्सचा टप्पा पार केला.
  वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतकांच्या सदिच्छांच्या बळावर महाराष्ट्र न्यूज वनने ही मजल मारली. पाच जुलै २०२० रोजी महाराष्ट्र न्यूज वनची सुरुवात झाली. प्रारंभापासूनच वस्तुनिष्ठ बातम्यावर भर दिला. कोणाचीही बाजू न घेता वस्तुनिष्ठ लेखन केल्यामुळे वाचकांच्या मनाचा ठाव घेतला. समाजमनाशी निगडीत विविध विषयांची मांडणी केली. राजकीय, महापालिका, जिल्हा परिषद, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडी अचूक स्वरुपात वाचकांपर्यंत पोहोचविल्या. कोल्हापूर शहरातील विविध समस्या मांडल्या. कला, क्रीडा क्षेत्रातील नवोदितांना प्रोत्साहित केले. चांगल्या उपक्रमांना समाजासमोर आणले. जे चांगले त्याचे कौतुक केले. जे चुकीचे त्याच्याविरोधात लिहिले. यामुळे महाराष्ट्र न्यूज वन वाचकांच्या आवडते माध्यम ठरत आहे. 
 या ऑनलाइन, डिजिटलच्या माध्यमातून  अनेक प्रश्नांना वाचा फोडली. महाराष्ट्र न्यूज वनची बातमी म्हणजे विश्वासार्हता अशी ओळख निर्माण झाली. आतापर्यंतच्या वाटचालीत वाचक, जाहिरातदार यांनी साथ दिल्यामुळे ५० लाख व्हिजिटर्सचा हा टप्पा कमी वेळेत पूर्ण झाला. महाराष्ट्र न्यूज वन हे केवळ कोल्हापूरच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडीवर प्रकाशझोत टाकते. विविध क्षेत्रातील राज्यस्तरावरील घडामोडी, बातम्या सर्वप्रथम महाराष्ट्र न्यूज वनने वाचकांना उपलब्ध करुन दिल्या. यामुळे वाचकांची नेहमीच पसंती मिळतेय, ‘महाराष्ट्र न्यूज वन’ला !

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes