Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात जलसमाधी आंदोलन, पोलिसांनी रोखले कार्यकर्त्यांनाशक्तिपीठ महामार्ग विरोधात जोरदार आंदोलन, तीन तास राष्ट्रीय महामार्ग ठप्पस्त्यावर जनावरे, मालकांना दंड ! महापालिकेकडून राजारामपुरीत कारवाईफुटबॉलपटूची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली, निखिल खाडेचे निधनतात्यासाहेब कोरे डिप्लोमा कॉलेजच्या विद्यार्थ्यांची निकालाची यशस्वी परंपरा कायमआझाद मैदान येथील शिक्षक आंदोलनाला राजकीय नेत्यांचा पाठिंबासतेज मॅथ्समुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड वाढेल – देवश्री पाटीलजिपचा  शिक्षण विभाग राज्यात अव्वल, शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात कोल्हापूर प्रथमस्थानी !हर्षल सुर्वे शिवसेना शिंदे गटात ! राजेश क्षीरसागरांच्या उपस्थितीत प्रवेश !!संजय पवारांचा शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा ! राजीनामा मागे घेण्यासाठी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी!!

जाहिरात

 

कोल्हापुरात एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनचे ४७ वे राज्यव्यापी अधिवेशन

schedule21 Apr 25 person by visibility 235 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड ऑफिसर्स असोसिएशनचे ४७ वे राज्यव्यापी अधिवेशन २६ व २७   एप्रिल २०२५ रोजी कोल्हापुरातील ‘द फर्न हॉटेल’मध्ये होणार आहे. या अधिवेशनास महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आणि सूत्रधारी कंपनीतील वर्ग   आणि वर्ग दोनचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे राहणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महावितरणचे संचालक (संचालन/मानव संसाधन) अरविंद भादिकर, महापारेषणचे प्रभारी संचालक (मानव संसाधन) सुगत गमरे, महावितरणचे प्रादेशिक संचालक (पुणे) भुजंग खंदारे, प्रभारी कार्यकारी संचालक (मानव संसाधन) व प्रादेशिक संचालक (नागपूर) परेश भागवत, महानिर्मितीचे प्रभारी कार्यकारी संचालक (मानव संसाधन) नितीन वाघ, महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर हे उपस्थित राहणार आहेत.

या अधिवेशनात ऊर्जा क्षेत्रातील तिन्ही कंपन्यांची सद्यस्थिती, खासगीकरण व वीज उद्योग आर्थिक सक्षमीकरण, अतांत्रिक अधिकाऱ्यांची सरळसेवा भरती, पदोन्नती, मनुष्यबळ पुनर्रचना यावर विचार मंथन होणार असल्याने हे अधिवेशन महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांच्या वाटचालीत दिशादर्शक ठरेल, असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष दिनेश लडकत, सरचिटणीस संजय खाडे, संघटन सचिव विजय गुळदगड आणि केंद्रीय कार्यकारिणीने व्यक्त केला आहे.  हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी अधिकारी संघटनेच्या कोल्हापूर कार्यकारिणीचे अध्यक्ष अप्पासाहेब पाटील, सचिव श्रीकांत सनगर, शशिकांत पाटील, शंकर सावंत, विनोद खोत, अविनाश कर्णिक, महेश साळुंखे, प्रकाश शिंदे, सारंगधर कळसकर, विश्वजीत भोसले यासह कोल्हापूर परिमंडल कार्यकारिणीचे सर्व सभासद झटत आहेत. अधिवेशनास सर्व सभासदांनी, पदाधिकाऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे सरचिटणीस संजय खाडे यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes