Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
 अभियंता तरुण पिढीने उद्योजकीय मानसिकता बाळगावी - दीपक जोशी२१ लिटर दुधाची म्हैस, ३५ लिटर दुधाची गाय ठरली गोकुळश्रीकोल्हापुरात गव्हर्मेंट लॉ कॉलेज सुरू करा-: अमल महाडिकांची मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणीएनएमएमएस परीक्षा 28 डिसेंबरलासीपीआरमधील वैद्यकीय बिलांच्या चौकशीसाठी समिती, पालकमंत्र्यांचे आदेशाने समिती स्थापन रहिवासाचा कोणताही पुरावा ग्राह्य धरा : माजी नगरसेवकांची आयुक्तांच्याकडे मागणी महापालिकेची अंतिम मतदार यादी पुन्हा लांबणीवर, 15 डिसेंबरला यादी जाहीर होणार खाबुगिरीची सेवा, सीपीआरमधील मॅडम, सरांच्या नावावर लाखोची आकडेमोड! वैद्यकीय बिल मंजुरीत डल्ला !!ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांचे धरणे आंदोलन, संचमान्यतेतील त्रुटी दूर कराशिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांची कोल्हापुरात बदली

जाहिरात

 

विट्यात रविवारी ४३ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

schedule05 Feb 25 person by visibility 489 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सांगली जिल्ह्यातील विटा येथे रविवारी, (९ फेब्रुवारी २०२५) ४३ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होत आहे. भारतमाता ज्ञानपीठ या संस्थेतर्फे संमेलनाचे आयोजन केले आहे.  राधा -रामकृष्ण बापट मुक्तांगण वाचनालयाच्या प्रांगणात  संमेलन होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस असणार आहेत. अशी माहिती संयोजक रघुराज मेटकरी यांनी दिली.
 यादिवशी सकाळी ९.३० वाजता कवठेमहाकांळ नगरपंचायतचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून संमेलनाची सुरुवात होणार आहे. कवी आनंदहरी यांच्या अध्यक्षतेखाली कवीसंमेलन आहे. त्यामध्ये अनेक कवी सहभागी होणार आहेत. दुसरे सत्र दुपारी चार वाजता सुरू होणार आहे. त्याचे उद्घाटन अध्यक्ष आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र शासनाचे डॉ. ओमप्रकाश शेटे  करणार आहेत. आमदार डॉ. विश्वजीत कदम हे प्रमुख पाहुणे आहेत. स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. दिनकर पाटील  आहेत. तिसऱ्या सत्रात रात्री ८.३० वाजता कथाकथन व संमेलन समारोप आहे. प्रमुख पाहुणे प्रा. सिद्धेश्वर सपकाळ आहेत. प्रा. विश्वनाथ गायकवाड, नागु विरकर, जयवंत आवटे यांचे कथाकथन आहे.
प्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री पु. ल. देशपांडे यांच्या नावाने उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मितीचा पुरस्कार प्रा. विश्वनाथ गायकवाड व श्रीमती शकुंतला अण्णा होनमाने व आदर्श शिक्षक पुरस्कार संपत शेळके यांना व ज्ञानोबा बापू काळे उत्कृष्ट वांड्मय निर्मिती पुरस्कार डॉ. मुरहरी केळे यांना व हौसाबाई ज्ञानोबा काळे उत्कृष्ट वाड्मय निर्मिती पुरस्कार प्रा. डॉ. श्रुती श्री वडगबाळकर व साहित्यिक द.का.हसमनीस उत्कृष्ट वाड्मय निर्मिती पुरस्कार प्रा.डॉ. विनोद गायकवाड यांना देण्यात येणार आहे. साहित्यिक सुनील दबडे यांच्या 'बनगी आणि बिरमुटं' कथासंग्रह व साहित्यिक रमेश गायकवाड यांच्या 'पर्यावरणाचा छोटा रक्षक"एकांकिका संग्रहाचे प्रकाशन यावेळी होणार आहे. संमेलन यशस्वी करण्यासाठीडॉ. ऋषिकेश मेटकरी, वैशाली कोळेकर, अरुण लंगोटे , हर्षवर्धन मेटकरी आदी  योगदान देत आहेत. वाचनप्रेमींनी या संमेलनास मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यवाह योगेश्वर मेटकरी यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes