Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळचे संचालक विश्वास पाटलांचा शिवसेना पक्षप्रवेश लांबणीवर, मुंबईत होणार प्रवेशाचा कार्यक्रम प्रभाग सतरामध्ये जनसुराज्यची माघार, काँग्रेसला पाठिंबा जागतिक दर्जाच्या संशोधनाकडे वाटचाल करा - डॉ. विनायक पारळे राजर्षी शाहू आघाडीचा वचननामा प्रसिद्ध ! व्ही. बी. पाटील म्हणाले, महाविकास - महायुतीचे राजकारण घराणेशाहीचे- पैशाचे.तेच प्रेम…तोच पाठिंबा… आमची नाळ जनतेशी जुळलीय ! अण्णांची स्वप्नं सत्यजीत पूर्ण करणार- जयश्री जाधवमंगळवार पेठेत दिसतेय जाधव कुटुंबीयांच्याप्रती प्रेम सतेज पाटलांचा तरुणाईशी संवाद, कोल्हापूरच्या विकासासंबंधी चर्चाकोल्हापुरात काँक्रिटचे रस्ते, आयटी हबला प्राधान्य ! झोपडपट्टीवासियांना प्रॉपर्टी कार्ड, गरीबांना पक्की घरे !!गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील शिवसेनेत जाणार, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शनिवारी प्रवेशभागीरथी नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अरूंधती धनंजय महाडिक, उपाध्यक्षपदी वैष्णवी महाडिक

जाहिरात

 

राजर्षी शाहू आघाडीचा वचननामा प्रसिद्ध ! व्ही. बी. पाटील म्हणाले, महाविकास - महायुतीचे राजकारण घराणेशाहीचे- पैशाचे.

schedule10 Jan 26 person by visibility 55 category

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : महाविकास आघाडी व महायुतीचे राजकारण हे घराणेशाहीला बळ देणारे व पैशाच्या जोरावर सुरू आहे.  अशा प्रकारच्या राजकारणाला छेद देत राजर्षी  शाहू आघाडीने शहर विकासासाठी काम करणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. महापालिकेतील टक्केवारी आणि भ्रष्टाचाराला ब्रेक लावण्याचे काम आमचे उमेदवार करतील असा विश्वास या आघाडीचे नेते व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष  ही. बी. पाटील यांनी व्यक्त केला. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी आहे. या आघाडीतर्फे वचननामा प्रसिद्ध करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.
 राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पाटील, निवडणूक निरीक्षक बाजीराव खाडे,  शहराध्यक्ष आर के पोवार, आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अनिल घाटगे, युवक आघाडीचे पदाधिकारी रोहित पाटील, गणेश जाधव, उमेदवार  प्रमोद दाभाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आघाडीचा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. या वचननामांमध्ये एकूण 25 विकास योजनांचा समावेश आहे. यामध्ये कोल्हापुरातील अंतर्गत रस्ते शंभर टक्के दर्जेदार केले जातील. वाहतूक व सुरक्षा व्यवस्था, आयआरबीचे 51 किलोमीटर रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी विशेष निधी उपलब्ध करणे, फेरीवाला झोन फेर सर्वेक्षण,  शहरातील मुख्य रस्ते पार्किंग विरहित करणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अर्थात केएमटी बळकट करणे, फुटपाथवर कोणत्याही प्रकारे अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेणे, पूर्ण क्षमतेने स्वच्छ व मुबलक पाणी देणे, महापालिकेचे शाळा अद्ययावत करणे, त्याचबरोबर दोन शाळा या स्पोर्ट्स स्कूल म्हणून विकसित करणे श, महापालिकेतील इतर विभागाप्रमाणे क्रीडा विभाग समिती निर्माण करणे,  शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष केएमटी बस कायम उपलब्ध करून देणे, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल व आयसोलेशन ही रुग्णालय अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करणे, प्रभाग  दवाखाने सुरू करणे, हद्दवाढीला प्राधान्य,  केंद्र व राज्य सरकार बरोबर समन्वय साधन विकास निधी आणणे, महापालिकेचे मुख्य प्रशासकीय इमारत उभारणे,पंचगंगा, रंकाळा, राजाराम तलाव,  कळंबा तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी शहरातील पर्यावरण तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योजना आखली जाईल असे म्हटले आहे. याप्रसंगी बोलताना आपचे संदीप देसाई यांनी महाविकास आघाडी व महायुतीचे जाहीरनामे हे फसवणूक नामे आहेत. गेल्या निवडणुकीतील अनेक योजना नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या वचननाम्यामध्ये दोन्ही आघाड्यांनी समाविष्ट केले आहेत गेली पाच दहा वर्षे या आघाड्या काय करत होत्या लोकांना फसवणुकीचा हा प्रकार लक्षात आला आहे. आम आदमी पक्ष नेहमीच सर्वसामान्य लोकांना केंद्रस्थानी ठेवून काम करत आहे महापालिकेतही त्याच पद्धतीने काम करू.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes