Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
लग्न ठरवायला मुंबईला गेले अन् मुख्यमंत्री नागपूरला अशी विरोधकांची अवस्था - सतेज पाटलांचा महायुतीला टोलागोकुळचे माजी संचालक सत्यजीत सुरेश पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेशराज्यपालांच्यासोबत डॉ संजय डी. पाटलांचा संवाद ! कृषी, साखर उद्योग, दूध व्यवसाय, शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी चर्चा !!पदवीधरांचे रोजगार - आर्थिक प्रश्न घेऊन प्रा. एन. डी. चौगले पदवीधर निवडणुकीच्या मैदानातराज्यपालांनी साधला कोल्हापुरात मान्यवरांशी संवाद ! असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्टचे ४७ वे वार्षिक मॅपकॉन अधिवेशन कोल्हापुरातअपयशाकडे अपयश म्हणून नको त्यातून शिकण्याची संधी म्हणून पाहा –नेमबाज सोनम मस्करकोरे अभियांत्रिकीच्या सिव्हिल विभागातील विद्यार्थ्यांची दक्षिण आफ्रिकेतील कंपनीत  निवडफुलेवाडी परिसरात बिबट्या, वनविभागाकडून शोध ! पोलिस फौजफाटा तैनात ! !संवैधानिक संस्थावर अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसने थांबवावा - खासदार धनंजय महाडिक

जाहिरात

 

गोकुळचे माजी संचालक सत्यजीत सुरेश पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

schedule29 Sep 26 person by visibility 55 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अधकाधिक ठराव आपल्याकडे असावेत यासाठी नेतेमंडळी सरसावले आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष  व आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीही ताकतीने निवडणुकीत उतरली आहे. करवीर तालुक्यातील गोकुळचे माजी संचालक सत्यजीत सुरेश पाटील यांचा मंगळवारी, २९ सप्टेंबर २०२६ काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. आमदार पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अजिंक्यतारा कार्यालय येथे हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी जिल्हा परिषदेतील गटनेते एकनाथ पाटील, गोकुळचे माजी संचालक बाबासाहेब चौगले, अभिजीत तायशेटे, बयाजी शेळके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, नगरसेवक राहुल माने, डॉ. के एन पाटील आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes