जनसुराज्यकडून गोकुळसाठी अमरसिंह पाटील, करणसिंह गायकवाड, सिदगोंडा पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल
schedule17 Sep 26 person by visibility 68 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीसाठी जनसुराज्यशक्ती पक्षाकडून माजी संचालक अमरसिंह यशवंत पाटील, करणसिंह गायकवाड आणि गडहिंग्लज तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन सिदगोंडा शंकरगोंडा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. गुरुवारी 17 सप्टेंबर 20 26 रोजी रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथे निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगले यांच्याकडे त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. याप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग काशीद, जिल्हा परिषद सदस्य राजू बेलेकर, पंचायत समितीचे माजी सभापती अनिल कंदुरकर, पंचायत समिती सदस्य रणजीत शिवाजी शिंदे, भारत घाडगे जाखलेचे सरपंच महादेव देशमुख, ग्रामपंचायत सदस्य निलेश खोत आदी उपस्थित होते. जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते व आमदार विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना गोकुळच्या माध्यमातून दूध उत्पादकांना जास्तीत जास्त न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे . महायुती व मित्र पक्षाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाईल. असे उमेदवाराने सांगितले.