Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आर के कामत यांनी स्वीकारला कुलगुरूपदाचा कार्यभार परप्रांतियांची वैयक्तिक माहिती संकलित करा, आरपीआय गवई गटाची मागणीजिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला प्रारंभपत्रकार विजय चोरमारे यांना भाई माधवराव बागल पुरस्कार, २८ मे रोजी वितरण समारंभडॉ. आर. के. कामत शिवाजी विद्यापीठाचे नवीन कुलगुरू शहरातील विद्युत दिव्यांचा विषय अंधातरीच…ईईएसएल कंपनीसोबतचा करार महापालिकेकडून रद्द, नवीन कंपनीचा प्रस्ताव सभागृहाने फेटाळलाशिक्षकेतर कर्मचारी समायोजन  विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करणार : राजेंद्र कोरे प्रा. श्रुती जोशी यांची इचलकरंजीत प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती शिक्षक बँकेच्या लवकरच पाच शाखांचा विस्तार, मुख्यालयासमोरील अतिक्रमणे हटवून सभासदांसाठी आरक्षित पार्किंगशहर काँग्रेसमध्ये फेरबदल, सचिन चव्हाणांना हटविले, प्रवीण केसरकर नवे शहराध्यक्ष !जिल्हाध्यक्षपदी सतेज पाटील ! !

जाहिरात

 

आर के कामत यांनी स्वीकारला कुलगुरूपदाचा कार्यभार

schedule22 May 26 person by visibility 9 categoryशैक्षणिक

शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी आज विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडून कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी मावळत्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह कामत कुटुंबिय उपस्थित होते.

डॉ. कामत यांनी आज सकाळी कुलगुरू निवासस्थानापासून विद्यापीठाच्या प्रांगणामधील सर्व प्रवास इलेक्ट्रीक वाहनातून केला. विशेष म्हणजे या वाहनाचे सुकाणू त्यांनी स्वतःच हाती घेतले होते. त्यांच्यासोबत पत्नी, मुलगी आणि आत्या यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते. डॉ. कामत यांनी सर्वप्रथम विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर डॉ. आप्पासाहेब पवार, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यांनाही त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात प्रवेश केला. कुलगुरू दालनामध्ये प्रभारी कुलगुरू डॉ. गोसावी यांच्याकडून त्यांनी कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारली.

यानंतर लगेचच व्यवस्थापन परिषद सभागृहात प्रभारी कुलगुरू डॉ. गोसावी यांचा औपचारिक निरोप समारंभ झाला. यावेळी प्रभारी कुलगुरू डॉ. गोसावी यांच्यासह विद्यापीठाच्या पहिल्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा मैंदर्गी, मानवविज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख आणि आंतरविद्याशाखा प्रभारी अधिष्ठाता डॉ. अजय साळी यांनाही निरोप देण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कुलसचिव डॉ. शिंदे यांनी केले. कार्यक्रमास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, स्वागत परुळेकर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठातील कामाची शिस्त कौतुकास्पद: डॉ. गोसावी

शिवाजी विद्यापीठातील प्रशासकीय शिस्त ही वाखाणण्याइतकी चोख आहे. वरती अधिकारी कोणीही असला तरी इथला प्रत्येक सहकारी त्याला नेमून दिलेले काम मन लावून करीत असतो. आवश्यक तेथे सूचना देण्यापलिकडे त्यांना वेगळे काही सांगावे लागत नाही. शिवाजी विद्यापीठातील ही कार्यप्रणाली कौतुकास्पद स्वरुपाची आहे. त्यामुळे येथील प्रभारी कुलगुरू पदाचा कालखंड खूप चांगला पार पडला, असे मावळते प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी निरोप समारंभात सांगितले.

संधी दिल्याबद्दल कृतज्ञ: डॉ. ज्योती जाधव

केवळ शिक्षण आणि संशोधन यापलिकडे न पाहणाऱ्या माझ्यासारख्या एका प्राध्यापकाला प्रशासकीय काम करण्याची संधी देऊन शिवाजी विद्यापीठाची पहिली महिला प्रभारी प्र-कुलगुरू होण्याचा मान दिल्याबद्दल मावळत्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी डॉ. गोसावी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या काळात खूप काही प्रशासकीय बाबी शिकून घेता आल्या, असेही त्यांनी सांगितले.

बळीराजा महोत्सवाचे आयोजन, सोमवारी पुरस्कार वितरण

schedule12 Nov 20 person by visibility 687 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज 1, प्रतिनिधी,कोल्हापूर : बळीराजा महोत्सव समिती, श्री शाहू सत्यशोधक समाज, सत्यशोधक प्रबोधन महासभा आणि पुरोगामी कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमाने १६ नोव्हेंबर रोजी बळीराजा महोत्सव होत आहे. याप्रसंगी विविध पुरस्कारांनी मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात सायंकाळी पाच वाजता कार्यक्रम होणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील, बाबूराव कदम यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. 

प्रबोधन आणि परिवर्तनाचे काम करणाऱ्या व्यक्तींना ‘बळीराजा सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे.यामध्ये अनिल चव्हाण, नामदेव कांबळे, स्वाती कृष्णात आणि कृष्णात स्वाती, शफिक देसाई, दमयंती कडोलकर यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. प्राचार्य विश्वास सायनाकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होईल.शाहू सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष बाबूराव कदम अध्यक्षस्थानी असतील अशी माहिती संयोजकांनी दिली आहे. पत्रक व्यंकाप्पा भोसले,दिलीपकुमार जाधव, रवी जाधव, संभाजीराजे जगदाळे यांच्या नावानिशी प्रसिद्धीस दिले आहे.

………………………………….


जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes