ग्रामविकास अधिकारी गिरीगोसावी निलंबित
schedule20 Oct 23 person by visibility 292 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : घराचा गावठाण उतारा देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना सापडलेल्या प्रयाग चिखली येथील ग्रामविकास अधिकारी गोरख दिनकर गिरीगोसावी यास निलंबित करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी गिरीगोसावी यास निलंबित करण्याचे आदेश दिले. लाचखोर प्रकरणामुळे जिल्हा परिषदेची बदनामी झाल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १३ ऑक्टोबर रोजी गिरीगोसावी यास लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणातील तक्रारदाराला घराच्या बांधकामासाठी कर्ज काढायचे होते. त्यासाठी घराचा गावठाण उतारा हवा होता. हा उतारा देण्यासाठी गिरीगोसावीने दोन हजार रुपयांची मागणी केली होती.