जनतेच्या पाठबळावर विजय निश्चित : आमदार ऋतुराज पाटील
schedule09 Nov 24 person by visibility 57 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘’ गेल्या पाच वर्षात गावच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणला. या निधीतून विकासात्मक काम गावात झाले आहे. कार्यकर्त्यांचा विश्वास व बळ आपल्या पाठीशी कायम राहिल. सैनिक, ज्येष्ठ नागरिक, महिलासह जनतेचे आशीर्वाद व पाठबळावर माझा विजय निश्चित आहे ”असे मत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार व महाविकास आघाडीचे उमेदवार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केले.
आमदार पाटील यांच्या प्रचारार्थ गिरगावमध्ये पदयात्रा काढण्यात आली. गावातील श्री भैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन पदयात्रेला प्रारंभ केला. गावातील प्रमुख मार्गावरून पदयात्रा काढण्यात आली. यावेळी त्यांचे उत्साही स्वागत करण्यात आले. गेली पाच वर्ष कार्यकर्त्यांच्या ताकतीवर चांगले काम केल्याचे समाधान आहे असे पाटील यांनी नमूद केले.
पदयात्रेत सरपंच महादेव कांबळे, उपसरपंच उत्तम पाटील, उत्तम पाटील-नवाळे, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, संभाजी कोंडेकर, राजेंद्र कोंडेकर, चंद्रकांत कुरणे, श्रीकांत बागणे, अनिल म्हेत्रे, अनिल चव्हाण, पांडुरंग पाटील, शशिकांत साळुंखे, रघुनाथ पाटील, राजाराम चव्हाण, दत्ता साळुंखे, सुभाष पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.