Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
तुम्ही निवडणुका जिंकण्यात पटाईत ! मी राजकारणात नवखा, भांडल्याशिवाय न्याय मिळत नाही ! ! आमदार शिवाजी पाटील, मंत्री मुश्रीफांत टोलेबाजीखासबाग मैदानाची स्वच्छता, दसऱ्यानंतर खासदार - आमदारांच्या निवासस्थानासमोर निदर्शनेसंजय घोडावत विद्यापीठाचा सोळा ऑक्टोबरला दीक्षांत समारंभ गोकुळच्या व्यासपीठावर आबिटकर –के. पी. एकत्र !  महायुतीच्या विजयात राधानगरी- भुदरगडचा सिंहाचा वाटा असेल ! !शिक्षकांशी संवाद, प्रश्नांची उकल! कौस्तुभ गावडेंची शहरातील शैक्षणिक संस्थांना सदिच्छा भेटी! !आरपीआय गवई गटाचा महाविकास आघाडीला पाठिंबा! प्रा. जयंत आसगावकर, हर्षदा देशमुखांनाना दिले पाठिंब्याचे पत्र!!सतेज पाटील गृहराज्यमंत्री असताना गोकुळची सूत्रे मुंबईतून हलत होती - मंत्री हसन मुश्रीफ यांचा पलटवार आमदार फंडातील शंभर टक्के निधी आसगावकरांनी शाळांसाठी खर्च केला, नावातच जयंत असल्यामुळे पराभव अशक्य : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील४४०० ठराव असल्याचा डांगोरा पिटता, मग शपथा कशाला घ्यायला लावता ? महायुतीचे नेते मुंबई - दिल्लीपुढे हतबल : सतेज पाटलांचा हल्लाबोलगोकुळ निवडणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी लढत !  नविद मुश्रीफ विरुद्ध शशिकांत खोत!!

जाहिरात

 

मेघराज भोसलेंनी जाहीर केलेला निवडणूक कार्यक्रम बेकायदेशीर : धनाजी यमकरांचा हल्लाबोल

schedule16 Sep 22 person by visibility 832 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील राजकारण पुन्हा चिघळले आहे. महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर व अन्य संचालकांनी पत्रकार परिषद घेत मेघराज राजेभोसले यांच्यावर सडकून टीका केली. शिवाय भोसले यांनी जो निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे तो बेकायदेशीर असल्याचे यमकर यांनी सांगितले.
यमकर म्हणाले, ‘महामंडळाच्या घटनेप्रमाणे भोसले हे सध्या अध्यक्ष पदावर नाहीत. यामुळे त्यांना निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा नैतिक अधिकार नाही. आमचे डिपॉझिट जप्त करतो म्हणणाऱ्या भोसले यांनी येत्या निवडणुकीत आम्हा संचालकांच्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी’ असे खुले आव्हान यमकर यांनी दिले.
यमकर म्हणाले,‘मेघराज भोसले यांनी गेल्या तीन वर्षात महामंडळात मनमानी कारभार केला आहे. धक्कादायक म्हणजे २०२०-२१ चा ऑडीट रिर्पोट सर्व संचालकांच्या मंजुरीशिवायच धर्मादाय कार्यालयास सादर केला आहे. ऑडीटची सर्व कागदपत्रे मुख्य कोल्हापूर कार्यालयात असताना लेखाजोखा कसा केला ? त्यांच्या मनमानीकारभाराला सभासद कंटाळले आहेत. सभासदांच्या इच्छेनुसार आम्ही नव्याने अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर करत आहोत.
……………..
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे….
यमकर यांनी निवडणूक घेण्याविषयी जाहीर केले. यानंतर रणजित जाधव यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. ३ ऑक्टोबर रोजी सभासदांची पक्की यादी जाहीर होईल. १० ते १५ ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज वाटप होईल. २५ ते २८ ऑक्टोबरमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. एक नोव्हेंबर रोजी निवडणुकीस पात्र उमेदवारांची चिन्हासह अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. १३ नोव्हेंबर रोजी मुंबई,पुणे, कोल्हापूर येथे मतदान होईल. तर १५ नोव्हेंबर रोजी मतमोजणी आहे.
……………….
तेरा नोव्हेंबरला मतदान
उपाध्यक्ष यमकर म्हणाले, “कायदेशीर बाबी तपासून आणि तज्ज्ञांचा सल्ला घेउन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार महामंडळाच्या निवडणुकीसाठी तेरा नोव्हेंबर रोजी मतदान होईल तर १५ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. ॲड. के. व्ही.पाटील हे मुख्य निवडणूक अधिकारी असतील तर पराग भवसार (मुंबई),अशोक सासने (मुंबई), संतोष साखरे (पुणे),आनंद कुलकर्णी (कोल्हापूर), अरुण भोसले-चोपदार (कोल्हापूर) यांची निवडणूक समिती असेल.
पत्रकार परिषदेला सतिश बिडकर, विजय शिंदे, अमर मोरे,  उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes