+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustराजेश क्षीरसागर धावले पूरग्रस्तांच्या भेटीला, भर पावसात विविध ठिकाणांची पाहणी adjustकाँग्रेसकडून सतेज पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी ! समन्वय समितीत स्थान ! adjustजयंती नाल्यावर पाणी, वाहतुकीसाठी मार्ग बंद adjust४०९ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी ! सीईओंनी शब्द पाळला, शिक्षणाधिकाऱ्यांचे गतीमान कामकाज !! adjustपावसाचा रपाटा- पाण्याचा विळखा कायम ! घरांची पडझड, नागरिकांचे स्थलांतर!! adjustकास्ट्राइब शिक्षक संघटना कोल्हापूरतर्फे आरक्षण दिन साजरा adjustपूरग्रस्त कुंभार समाजाच्या मदतीसाठी भाजपाची जिल्हा प्रशासनाकडे धाव adjustभारतीय मजदूर संघाचा ६९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा adjustजबाबदारीने पेलतेय तरुण पिढी शिक्षण संस्थांची कामगिरी adjustदेवराज बोटिंग क्लबने रंकाळा तलावातील कचरा हटविला
1000653813
1000630884
1000621806
1000615695
schedule22 May 24 person by visibility 122 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिध : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व कोल्हापूर जिल्हा टेनिस संघटना(केडीएलटीए) यांच्या वतीने आयोजित १९ व्या रमेश देसाई मेमोरियल १६ वर्षाखालील राष्ट्रीय ज्युनियर टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्या फेरीत महाराष्ट्राच्या रिद्धी शिंदे, श्रेया पठारे, देवश्री महाडेश्वर, स्वानिका रॉय, सक्षम भन्साळी, वरद उंद्रे, तामिळनाडूच्या दीपशिका विनयगमूर्ती, तेलंगणाच्या कीर्तना रंगिनेनी, कर्नाटकाच्या चन्नामालिकाअर्जुन याले यांनी आपापल्या गटातील मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत त्यांचे आव्हान संपुष्टात आणले.  
कोल्हापूर येथील केडीएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात रिद्धी शिंदेने तामिळनाडूच्या अव्वल मानांकित दिया रमेशचा 5-3, 4-2 असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या महाराष्ट्राच्या श्रेया पठारे हिने कर्नाटकच्या आठव्या मानांकित काशवी सुनीलचा टायब्रेकमध्ये 3-4(5), 2-4, 5-3 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. महाराष्ट्राच्या देवश्री महाडेश्वरने दिल्लीच्या बाराव्या मानांकित वैष्णवी सिंगचा 4-0, 4-1 असा तर, तेलंगणाच्या कीर्तना रंगिनेनीने पश्चिम बंगालच्या तेराव्या मानांकित सौम्या चॅटर्जीचा 5-3, 5-4(2) असा पराभव करून आगेकूच केली. महाराष्ट्राच्या स्वानिका रॉयने कर्नाटकच्या अकराव्या मानांकित मेघना जीडीचे आव्हान 4-0, 4-1 असे मोडीत काढले. तामिळनाडूच्या दीपशिका विनयगमूर्तीने पंधराव्या मानांकित उत्तरप्रदेशच्या मिरया अगरवालचा 3-5, 4-1, 4-0 असा तीन सेटमध्ये पराभव केला. 
मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या सक्षम भन्साळीने सातव्या मानांकित मध्यप्रदेशच्या कनिष्क खथुरियाचा 4-0, 4-1 असा सहज पराभव केला. कर्नाटकच्या चन्नामालिकाअर्जुन याले याने ओडिशाच्या आठव्या मानांकित आदित्य आचार्यला 4-0, 4-2 असे पराभूत केले. महाराष्ट्राच्या वरद उंद्रे याने पंधराव्या मानांकित उत्तरप्रदेशच्या वंशराज जलोटाचा 4-0, 4-0 असा एकतर्फी पराभव केला.