कोल्हापूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला विशेष पुरस्कार
schedule22 Nov 23 person by visibility 373 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्यात २० नोव्हेंबर २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत "महा आवास अभियान २०२३-२४" राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या २३ नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता यशवंतराव चव्हाण सेटर ऑडिटोरीयम, जगन्नाथ भोसले मार्ग, नरिमन पाईट, मुंबई येथे होत आहे. याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला विशेष पुरस्कार प्राप्त झाला असून त्या ठिकाणी दिला जाणार आहे.
राज्यात राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण घर निर्माण कार्यालयाकडून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना,शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदीमा आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना आणि मोदी आवास घरकुल योजना अशा विविध ग्रामीण घरे निर्माण योजनां राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात महा आवास अभियान २०२१-२२ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या संस्था व व्यक्ती यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे.
पुरस्कार प्राप्त झालेल्या कोल्हापुरातील संस्था व व्यक्ती पुढील प्रमाणे- विशेष पुरस्कार - लॅंड बॅंक तयार करणे - सर्वोत्कृष्ट जिल्हा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कोल्हापूर यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. विशेष पुरस्कार बहुमजली इमारती बांधणे सर्व आवास योजना- सर्वोत्कृष्ट जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. विशेष पुरस्कार - घरकुल मार्ट - सर्वोत्कृष्ट जिल्हा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण - सर्वोत्कृष्ट तालुका पंचायत समिती गगनबावडा यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. जिल्हा प्रोग्रामर चंद्रकांत पाटील, जि.ग्रा.वि.यं व जिल्हा डेटा एंन्ट्री ऑपरेटर राजेंद्र कवडे जि.ग्रा.वि.यं. तालुका डेटा एंन्ट्री ऑपरेटर उमाकांत पडवळ पंचायत समिती गगनबाबडा या अधिकारी, कर्मचाऱ्यांना विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, प्रकल्प संचालक सुषमा देसाई उपस्थित राहणार आहेत.