भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी शाहरुख गडवाले
schedule04 Dec 23 person by visibility 178 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी, कोल्हापूर जिल्हा महानगर अल्पसंख्याक मोर्चा सरचिटणीसपदी शाहरुख अब्दुलबारी गडवाले यांची निवड करण्यात आली. अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आजम जमादार यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे, सत्यजित कदम यांचे मार्गदर्शन लाभले.