पन्हाळा तालुक्यातील कोतवाल परीक्षेत घोटाळा, नव्याने परीक्षेची मागणी !
schedule06 Nov 23 person by visibility 411 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील कोतवाल परीक्षेत घोटाळा झाला असून कोतवाल भरती रद्द करून जिल्हा प्रशासनाने नव्याने परीक्षा घ्यावी अशी मागणी, उदयसिंह हिंदुराव कांबळे आणि गजानन वसंत कोळी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
पन्हाळा तालुक्यातील कळे,आवळे, पन्हाळा, बोरपाडळे, देवाळे, वाघवे या गावांसाठी कोतवाल भरती परीक्षा दहा सप्टेंबर रोजी झाली. या परीक्षेची ५० प्रश्नांची प्रश्नपत्रिका होती. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय होते पन्हाळा परीक्षेसाठी मिळालेल्या पेपर वरती चार पर्याय ए बी सी डी असे नव्हते. परंतु चार पर्याय १, २, ३, ४ या अंकामध्ये होते. प्रश्नपत्रिका परीक्षा विद्यार्थ्यांसाठी दिली गेली त्यावेळी प्रश्नपत्रिका निळ्या शाईने पेनाने ए बी सी डी अशी अक्षरे 1,2,3,4, या चार पर्यायानुसार हस्तलिखित लिहिली गेली होती. तसेच प्रश्नपत्रिका क्रमांक देखील हस्तलिखित होता.
परीक्षा झाल्यानंतर उत्तरतालिका प्रसिद्ध करण्याची वेळ सायंकाळी पाच वाजता दिली होती .पण तसे न करता उत्तरतालिका पेपर झाल्यानंतर लगेचच पंधरा मिनिटात जाहीर करण्यात आली. परीक्षेचा अंतिम निकाल १३ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता जाहीरनाम्यानुसार जाहीर होणार होता. पण तो बदलून उमेदवारांना दिलेल्या हॉल तिकिटावर सहा वाजता प्रसिद्ध केला जाणार असे होते. तरीही अंतिम निकाल जाहीर न करता 13 तारखेला रात्री आठ वाजून 35 मिनिटांनी जाहीर केला आहे. वरील सर्व गोष्टी पाहता कोतवाल परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटलेली स्पष्ट दिसते. ही बाब परीक्षेच्या वेळी पर्यवेक्षकांना कळवून सुद्धा त्यांच्याकडे जाणून दुर्लक्ष केले. जिल्हा प्रशासनाने कोतवाल परीक्षा रद्द करून नव्याने पुन्हा परीक्षा घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. पत्रकार परिषदेला सायली कोळी, वैभव कोळी उपस्थित होते.