+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे.
Screenshot_20240226_195247~2
schedule29 Feb 24 person by visibility 258 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  ‘निवृत्त शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण मोराळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार यंदा मिलिंद यादव यांना दिला जाणार आहे.’अशी माहिती डॉ. सुनील पाटील व डॉ. ऋषिकेश जाधव यांनी दिली. 
 सोमवारी चार मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन येथे चाटे शिक्षण समूहाचे प्रा. डॉ. भारत खराटे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे. डॉ. मोराळे यांनी १०८ रुग्णवाहिकेचे विभागीय व्यवस्थापक म्हणून केलेले कामही उल्लेखनीय आहे. विद्यार्थी चित्रपट चळवळ आणि विविध सामाजिक कार्याची दखल घेवून मिलिंद यादव यांना पुरस्काराने गौरवले जाणार असल्याची माहिती वनौषधी विद्यापीठ संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील पाटील, डॉ. ऋषीकेश जाधव यांनी दिली. 
डॉ. मोराळे यांचे दोन वर्षापूर्वी अपघाती निधन झाले. त्यांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला गेल्या वर्षीपासून हा पुरस्कार दिला जातो. कोल्हापुरातील सामाजिक शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहनही पाटील व जाधव यांनी केले आहे.