Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महायुतीचे दोन्ही उमेदवार अभ्यासू, शिक्षणाविषयी तळमळ असणारे !  पहिल्या फेरीत विजयी करूया !! हसन मुश्रीफपदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीत वाद, शिवसेना ठाकरे पक्षाचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षावर हल्लाबोल ! ठाकरेंचे फोटो वापरल्यास कायदेशीर कारवाई ! !सत्तेचा घटक असतानाही शिक्षकांसाठी भांडलो, महाविकास आघाडीच्या कालावधीत जयंत आसगावकरांनी कुठले प्रश्न सोडवले ? कौस्तुभ गावडेंचा सवालकेआयटीच्या २६ विद्यार्थ्यांना टाटा पॉवरमध्ये ७ लाखांचे पॅकेजना रस्ते - ना गटारसाठी, आमदार फंडाचा निधी शाळांसाठी ! पाच जिल्ह्यातील शाळांना सात हजाराहून अधिक शैक्षणिक साहित्य वाटप ! !पदवीधरसाठी शिवसेना ठाकरे पक्षाचा आज प्रचार मेळावाउद्योगपती आण्णासाहेब चकोते यांना पितृ‌शोककोल्हापुरातील इंडस्ट्रीजसाठी महिनाभरात उद्योगमंत्र्यांच्यासोबत बैठक – आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरसीएचबी प्राध्यापकांची मानधनवाढ, सेवास्थैर्य, अकरा महिन्याच्या नियुक्तीसाठी सरकारदरबारी पाठपुरावा करणारमहायुतीच्या सत्ताकाळात पेपर आहेत पण परीक्षा लिक, डिग्री आहेत पण नोकरी नाही, स्थिती बदलण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या - हर्षवर्धन सपकाळ

जाहिरात

 

रग्गेडियन कोल्हापूर रन मॅरेथॉन रविवारी, पाच हजार स्पर्धकांचा सहभाग

schedule05 Feb 25 person by visibility 1245 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : रग्गेडियन कोल्हापूर रन मॅरेथॉन स्पर्धा रविवारी, (९ फेब्रुवारी २०२५) रोजी कोल्हापुरात होत आहे. यंदा या स्पर्धेत पाच हजार स्पर्धक सहभागी होतील.अशी माहिती कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष चेतन चव्हाण आणि रगेडीयन क्लबचे आकाश कोरगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 ही मॅरेथान स्पर्धा त्यादिवशी सकाळी सहा वाजता सुरू होईल. पहाटे ६ वाजता सुरू होणार आहे.   यामध्ये २१ आणि १० किलोमिटर रन सकाळी ६ वाजता सुरू होणार आहे तर ५ किलोमीटर रन ही सकाळी ६.३० वाजता सुरू होणार आहे. विजेत्यांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. 

ही मॅरेथॉन ५, १० आणि २१ किलोमीटर अशा तीन गटांमध्ये होईल. यासाठी वयोगट पुढीलप्रमाणे आहेत. यामध्ये अठरा वर्षाखालील, १८ ते ३० वर्षे वयोगट, ३१ ते ४५ वर्षे वयोगट, ४६ ते ६० वर्षे वयोगट आणि साठ वर्षावरील अशी स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी नाव नोंदणी केलेल्या प्रत्येक स्पर्धकास टी-शर्ट, मेडल, टाईम चिप, सर्टिफिकेट, बॅग, रेसचे फोटो आणि अल्पोपहार दिला जाईल.इच्छुकांनी नोंदणीसाठी रगेडियन जिम, येथे भेट द्यावी. अधिक माहितीसाठी www.ruggedian.com या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा ७७२२०६७४७७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

स्पर्धेसाठी डी. वाय. पाटील ग्रुप, एस.जे. आर टायर,आणि डीकॅथलॉन ,रेडिओ मिर्ची यांचे सहकार्य लाभले आहे.या रन मधे कोल्हापूरकरांनी आपल्या कुटुंबियांसमवेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.पत्रकार परिषदेला आशिष तंबाके,अदित्य शिंदे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes