आशा वर्कर्स-गटप्रवर्तक युनियनतर्फे सोमवारी रास्ता रोको आंदोलन.
schedule03 Nov 23 person by visibility 290 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने आशा आणि गटप्रवर्तकांच्या मागणीसाठी सोमवारी सहा नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता गोकुळ हॉटेल चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेस चंद्रकांत यादव आणि युनियनच्या जनरल सेक्रेटरी उज्वला पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात अशा व गटप्रवर्तकांचा 18 ऑक्टोबर पासून बेमुदत संप सुरू आहे . त्यामध्ये गटप्रवर्तकांचे समायोजन झाले पाहिजे, ऑनलाइन कामाची सक्ती बंद करा, आशा आणि गटप्रवर्तक यांना दिवाळीला पाच हजार रुपयांचा बोनस मिळाला पाहिजे या मागण्यासाठी संप सुरू आहे. बुधवारी एक नोव्हेंबर रोजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आशा वर्कर यांना सात हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना सहा हजार दोनशे रुपये मानधनात वाढ जाहीर करण्यात हा निर्णय घेतला .तसेच दिवाळीचा बोनस म्हणून दोन हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे .मात्र त्यांचा हा निर्णय कृती समितीला मान्य नाही. गटप्रवर्तकांना मानधनाची रकमेत वाढ केलेली नाही. त्यामुळे त्यांच्यात मोठी नाराजी निर्माण झाली आहे. तसेच आशा कर्मचाऱ्यांच्या वर ऑनलाईन कामाची सक्ती मागे घेतलेले नाही. सरकारने आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्या मान्य केल्या नसल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी बारा वाजता दसरा चौकातून मोर्चा काढण्यात येणार आहे .त्यानंतर गोकुळ हॉटेल चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी युनियनच्या कोषाध्यक्ष संगीता पाटील, मनीषा पाटील ,प्रतिभा इंदुलकर ,वसुधा बोडके, पूजा भित्तम ,सुरेखा तिसंगीकर ,राधिका घाटगे, विमल अतिग्रे, गीता चव्हाण, नंदिनी करडे आदी उपस्थित होत्या.