Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आयुक्त अॅक्शन मोडवर, नेत्रदीप सरनोबत, रमेश कांबळेंची खातेनिहाय चौकशी ! तीन अधिकारी निलंबित ! !प्रत्येक तालुक्यातील एका गावात प्लास्टिक कचरा प्रक्रिया केंद्र शिक्षक बदली पोर्टलमधील अअनियमितता दूर करा, अन्यथा कोर्टात दाद मागणार : पुरोगामी शिक्षक संघटनापालक सहभागातून वर्गाचा कायापालट, नेहरुनगर विद्यामंदिरातवारणा समूह विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी डॉ. दिगंबर शिर्केमला पैसे खायला आवडतात-माझं पगारात भागत नाही : महापालिकेतील भ्रष्ट यंत्रणेविरुद्ध आपचे आंदोलनन्यू वूमेन्स कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक निसर्ग संवर्धन दिन उत्साहातसिद्धगिरी हॉस्पिटलचा सेवाभाव, एक लाखात एंडोस्कोपिक कि - होल शस्त्रक्रिया शिक्षकांच्या चौथ्या टप्प्यातील बदलीसाठी प्राधान्यक्रम नोंदविण्याची सुविधा उपलब्धआशा- गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीतर्फे पालकमंत्र्यांना निवेदन

जाहिरात

 

रत्नागिरीजवळ मिनी बस –टँकरचा अपघात, तीसहून अधिक शिक्षक जखमी

schedule08 Jun 25 person by visibility 1340 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी  : मुंबई –गोवा महामार्गावर रत्नागिरी नजीक बावनदी येथे सीएनजी वाहून नेणारा टँकर आणि मिनी बसचा अपघात झाला. यामध्ये मिनी बसमधील तीसहून अधिक शिक्षक जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमी शिक्षकांना रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले आहे. हे सगळे शिक्षक चिपळूणहून रत्नागिरीकडे प्रशिक्षणासाठी निघाले होते. दरम्यान अपघात झाल्यानंतर टँकरमधील सीएनजी हवेत पसरला. गॅस गळतीमुळे दुर्घटना घडली. यामध्ये एका घराला आग लागली. जनावरे होरपळली आहेत. शेतीचेही नुकसान झाले आहे. दरम्यान टँकरची मिनी बसला जोरदार धडक बसली. यामुळे मिनी बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. मिनी बस दरीत कोसळली. यामध्ये तीस शिक्षक जखमी झाले. अपघाताचे वृत्त समजताच पोलिस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. काही वेळ या मार्गावरील वाहतूक थांबवली होती.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes