उपमुख्यमंत्र्यांच्यासोबत हद्दवाढप्रश्नी सोमवारी मुंबईत बैठक
schedule22 Mar 25 person by visibility 124 categoryमहानगरपालिका
उपमुख्यमंत्र्यांच्यासोबत हद्दवाढप्रश्नी सोमवारी मुंबईत बैठक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीप्रश्नी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सोमवारी (२४ मार्च २०२५)
विधानभवनात बैठक होत आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी, पत्राद्वारे हद्दवाढीसंदर्भात बैठक
घ्यावी अशी मागणी केली होती. हद्दवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार क्षीरसागर यांनी बैठक घेण्याची मागणी केली
होती. त्यानुसार, सोमवारी दुपारी दोन वाजता बैठक होत आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार क्षीरसागर, आमदार अमल महाडिक,
आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या
उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे. हद्दवाढीवरुन गेले महिनाभर समर्थक व विरोधक यांच्यामध्ये आरोप, प्रत्यारोप सुरू आहेत. दोन्ही बाजूनी
बैठका घेतल्या जात आहेत.