महालक्ष्मी शेतकरी आघाडीचा आज प्रचार शुभारंभ
schedule22 Nov 23 person by visibility 348 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : बिद्री साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्ताधारी ‘श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडी’च्या प्रचाराचा शुभारंभ बुधवारी, २२ नोव्हेंबर रोजी होत आहे. ज्योतिर्लिंग देवालय वाघापूर येथे येथे प्रचाराचा श्रीफळ वाढविण्यात येणार आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव, माजी आमदार बजरंग देसाई, माजी आमदार संजय घाटगे, गोकुळचे अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे यांच्या उपस्थितीमध्ये प्रचार शुभारंभ होणार आहे. बिद्रीच्या कार्यक्षेत्रातील सभासदांनी या प्रचार शुभारंसाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन व सत्ताधारी पॅनेलचे नेते माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले आहे. सकाळी ९ वाजता प्रचार शुभारंभ स्थळी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.