Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या यासाठी आमचा लढापुण्यात  आंतर प्रादेशिक राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा-२०२६चे उद्घाटनकौस्तुभ कामाचा, शिक्षकांच्या हक्काचा…!पार्किंगच्या जागेचा अनधिकृत वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई, हॉटेल्स-हॉस्पिटल्स-व्यापारी संकुलांच्या बांधकामांची तपासणीस्मॅकच्या वार्षिक सभेत यतीन शाहांच्या मुलाखतीतून गवसली उद्योग - व्यवसायाची यशस्वितेची सूत्रे, सहा युवा उद्योजकांचा गौरवकेएमएतर्फे दोन दिवसीय वैद्यकीय परिषद, डॉ. विवेकानंद कुलकर्णींना जीवन गौरव पुरस्कारऑडिओ क्लिपमधील चर्चा करणारे भाजपशी संबधित, भाजपने स्पष्टीकरण द्यावे - मंत्री उदय सामंत शिक्षक-शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी  प्रा. जयंत आसगावकर यांना विजयी करा : मालोजीराजे छत्रपती सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता, १५६ जणांवर कारवाईप्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध- कौस्तुभ गावडे

जाहिरात

 

शिवसेनेचे उमेदवार सचिन सानप यांच्याकडून शिक्षक मतदारांना लक्ष्मीदर्शन - आमदार सतेज पाटलांचा आरोप

schedule21 Oct 26 person by visibility 273 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी -:  पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातील शिवसेनेने पाठिंबा दिलेले उमेदवार सचिन सानप यांच्याकडून शिक्षक मतदारांना लक्ष्मीदर्शन केले जात आहे. शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत चुकीचे पायंडे पाडले जात आहेत. सानप यांच्याकडून मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा व्हिडिओ आपल्याकडे आहे.’असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते व आमदार सतेज पाटील यांनी केला.

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत बारामती येथील उमेदवार प्रफुल्ल तावरे यांनी महाविकास आघाडीतंर्गत काँग्रेसचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांना पाठिंबा दिला. यासंबंधी बुधवारी, ()२१ ऑक्टोबर २०२६) कोल्हापुरात पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार पाटील यांनी निवडणुकीतील गैरप्रकारावरुन महायुतीवरही निशाणा साधला. ‘भाजपचे दोन्ही उमेदवारही मतदारांना लक्ष्मीदर्शन घडवित असल्याचा आरोप त्यांनी केला. शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणूकही शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न, त्यांच्यासमोरील आव्हाने, पुढील धोरण, शिक्षण क्षेत्राशी निगडीत समस्येवर आधारित व्हायला पाहिजे. मात्र गेले दोन ते तीन दिवस शिवसेनेच्या सचिन सानप यांच्याकडून मतदारांना लक्ष्मीदर्शन सुरू झाला आहे. पुण्यातून सुरू झालेला लक्ष्मीदर्शनाचा प्रवास आता कोल्हापूरपर्यंत पोहोचला आहे. यासंबंधी शिक्षकांच्या तक्रारी येत आहेत. सानप यांच्याकडून निवडणुकीत चुकीचे पायंडे पाडले जात आहेत.’असा आरोपही पाटील यांनी केला.

पुणे विभागीय पदवीधर व शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून येतील. महायुतीच्या पदवीधरमधील उमेदवार स्मिता जाधव या आमदार पाटील यांच्या भाची आहेत. याकडे लक्ष वेधले असता आमदार पाटील म्हणाले, ‘पुणे पदवीधर मतदारसंघासंबंधी माझी भूमिका यापूर्वी मी स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांना आमचा पाठिंबा आहे. माझ्या पक्षाची भूमिका आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढत आहोत. माझेही करिअर आहे. मी, काँग्रेस पक्षाचा आहे.’

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes