Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या घटत्या संख्येचा प्रश्न विधानपरिषदेतपालकमंत्र्यांनी बुलेट चालवत नोंदविला मिलेट महोत्सव रॅलीत सहभागशिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम ठेवावे : सुप्टाची मागणीउपमुख्यमंत्र्यांच्यासोबत हद्दवाढप्रश्नी सोमवारी मुंबईत बैठक राजमाता जिजाऊ रथयात्रेचे गोकुळतर्फे स्वागतशिवाजी विद्यापीठ नावासंबंधी शिवप्रेमींची शनिवारी बैठकमहापालिकेची कोल्हापूर शहर-गांधीनगरात कारवाई, पाच हजार किलो प्लॅस्टिक जप्तथकबाकीपोटी कोटीतार्थ मार्केटमधील पाच दुकान गाळे सील भगवान महावीर अध्यासनासाठी एक लाखाची देणगी तिटवे येथे होम मिनिस्टर स्पर्धा उत्साहात ! लतिका कांबळेने जिंकली मानाची पैठणी ! !

जाहिरात

 

कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागाच्या विकासासंबंधी आमदार महाडिकांची अधिकाऱ्यांसोबत बैठक

schedule05 Feb 25 person by visibility 250 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागातील विविध प्रलंबित प्रश्‍न आणि विकास नियोजनासाठी आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.

 शहरालगतच्या गावांची गावठाण हद्द वाढवणं, त्या जमीनींची मोजणी करून संबंधित नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देणं, विमानतळ विस्तारीकरण, क्रीडा संकुल, शिवाजी स्टेडीयम, हॉकी स्टेडीयम, गांधी मैदान आणि ग्रामीण भागात क्रीडांगण विकसित करण्यासाठी २०० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. ट्रक टर्मिनल, कचरा व्यवस्थापन, आयटी पार्कसाठी जमीन, तामगाव रस्ता, केंद्रीय विद्यालय, उड्डाण पुलाजवळ वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठोस नियोजन करण्याच्या सूचना महाडिक यांनी प्रशासनाला दिल्या.
  जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रांतधिकारी हरिष धार्मिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, तहसीलदार स्वप्निल रावडे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, भूमी अभिलेखचे अधीक्षक शिवाजीराव भोसले, क्रीडा अधिकारी अरूण पाटील, सुधाकर जमादार यांच्यासह विमानतळ आणि विविध विभागांचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

तावडे हॉटेल जवळ ट्रक टर्मिनलसाठी २३ एकर जागा आरक्षित करण्यात आलीय. त्यापैकी जी जागा ताब्यात आहे, त्या जागेवर ट्रक टर्मिनल करण्याची सुचना आमदार अमल महाडिक यांनी दिली. विमानतळ विस्तारीकरण आणि तामगावकडं जाणार्‍या रस्त्याबद्दल जलद गतीनं कार्यवाही करण्याचं बैठकीत ठरलं. विमानतळाशेजारच्या गावातील कचरा व्यवस्थापन करण्याची बैठकीत चर्चा झाली. गायरानामधील जागा कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्याचं आश्‍वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिलं. त्याचप्रमाणं कसबा बावडयातील वॉटर पार्कच्या जागेचा विकास करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आमदार महाडिक यांनी दिल्या आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes