मारुती माळींना जीवनगौरव, शरद माळींना समाजभूषण पुरस्कार ! १३ ऑक्टोबरला वितरण !!
schedule07 Oct 24 person by visibility 612 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेतर्फे देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते मारुती माळी तर समाजभूषण पुरस्कार निवृत्त पोलीस उपनिरीक्षक शरद माळी यांना जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्कारांचे वितरण तेरा ऑक्टोबर रोजी होणाऱ्या समाजाच्या मेळाव्यात विविध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. राजारामपुरी येथील व्ही. टी. पाटील सभागृह येथे समाज व वधू -वर, पालक मेळावा होणार आहे. या मेळाव्यात या दोन्ही पुरस्काराचे वितरण खासदार शाहू महाराज व खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
या मेळाव्याचे उद्घाटन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी आमदार अमल महाडिक, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहूल आवाडे, वीरशैव बँकेचे अध्यक्ष दिलीप चौगले, डॉ. डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय माळी, उद्योजक सी.एम. माळी, दक्षिण महाराष्ट्र वीरशैव समाजाचे अध्यक्ष राजू वाली हे उपस्थित राहणार आहेत.