Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आयुक्त अॅक्शन मोडवर, नेत्रदीप सरनोबत, रमेश कांबळेंची खातेनिहाय चौकशी ! तीन अधिकारी निलंबित ! !प्रत्येक तालुक्यातील एका गावात प्लास्टिक कचरा प्रक्रिया केंद्र शिक्षक बदली पोर्टलमधील अअनियमितता दूर करा, अन्यथा कोर्टात दाद मागणार : पुरोगामी शिक्षक संघटनापालक सहभागातून वर्गाचा कायापालट, नेहरुनगर विद्यामंदिरातवारणा समूह विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी डॉ. दिगंबर शिर्केमला पैसे खायला आवडतात-माझं पगारात भागत नाही : महापालिकेतील भ्रष्ट यंत्रणेविरुद्ध आपचे आंदोलनन्यू वूमेन्स कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक निसर्ग संवर्धन दिन उत्साहातसिद्धगिरी हॉस्पिटलचा सेवाभाव, एक लाखात एंडोस्कोपिक कि - होल शस्त्रक्रिया शिक्षकांच्या चौथ्या टप्प्यातील बदलीसाठी प्राधान्यक्रम नोंदविण्याची सुविधा उपलब्धआशा- गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीतर्फे पालकमंत्र्यांना निवेदन

जाहिरात

 

सरगम म्युझिकल ग्रुपतर्फे पंधरा जूनला लावणी-लोकगीत गायन

schedule10 Jun 25 person by visibility 532 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त  सरगम म्युझिकल ग्रुप एसएतर्फे लावणी व लोकगीत गायनचा कार्यक्रम १५ जून २०२५ रोजी आयोजित केला आहे. या कार्यक्रमात ८० हौशी कलाकार हे १०० लावणी व लोकगीते गाणार आहेत.अ शी माहिती संयोजक डॉ. आशा शितोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सागरमाळ प्रतिभानगर येथील श्री महालक्ष्मी सभागृह येथे सकाळी ९.३० वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. या उपक्रमाची नोंद ग्लोबल जिनीअस बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे. यासाी निरीक्षक संजय जाधव उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची गेली तीन महिने तयारी सुरू आहे. सरगम म्युझिकल ग्रुपमध्ये हौशी गायक आहेत. विविध क्षेत्रातील ही मंडळी आपआपला व्यवसाय सांभाळत गायन कला जोपासली आहे. सहभागी कलाकारांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, मेडल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला उदय पाटील, राजकुमार पारकर, डॉ. अनिल कवठेकर, माया मनपाडळेकर, चित्रा कवाळे, संगिता खानविलकर, के. टी. शिंदे, प्रा. मंजुषा लोंढे, धनाजी लोंढे, अस्मिता शितोळे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes