+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही !
Screenshot_20240226_195247~2
schedule04 Oct 22 person by visibility 371 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकतर्फे प्रतिवर्षी विभागीय युवक महोत्सव आयोजित केला जातो. या वर्षी शुक्रवारी (ता.७ ऑक्टोबर २०२२) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, विभागीय केंद्र, कोल्हापूर व महावीर महाविद्यालय,कोल्हापूर अभ्यासकेंद्र यांच्या विद्यमाने युवक महोत्सवाचे आयोजन केले आहे.
युवक महोत्सवाचा उद्घाटन समारंभ सकाळी ११ वाजता महावीर कॉलेज परिसरातील श्री आचार्य विद्यानंद भवन येथे होत आहे. या युवक महोत्सवामध्ये संगीत ,नृत्य , वाड्मयीन कला, रंगमंचीय कला व ललित कला या पाच कला प्रकार अंतर्गत २७ प्रकारांमध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहे.
 या युवक महोत्सवमध्ये कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातील विविध अभ्यासकेंद्राचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.लोखंडे, केंद्र संयोजक प्रा.जयवंत दळवी, केंद्र सहाय्यक बसवराज वस्त्रद व सांस्कृतिक प्रमुख प्रा.सौरभ पाटणकर यांनी या पत्रकाद्वारे प्रसिद्ध केले आहे.