Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शक्तीपीठ महामार्गविरोधात आता राज्यव्यापी आंदोलन, बांदा ते वर्धा निघणार संघर्ष यात्रा !सोमवारी अध्यक्ष बनले, गुरुवारी खत कारखाना सुरू झाला ! बाबासाहेब शिंदेंचे कृतिशील पाऊल !!महापालिकेकडून शहरातील उद्यानांचा खेळखंडोबा ! प्रवेशद्वारासमोर खेळणी रचून आपचे आंदोलन !!नवोदित उद्योजकांसाठी केआयटीची अभिनव संकल्पना, ई-समिटमध्ये ४०० विद्यार्थ्यांचा सहभागडीवाय पाटील कृषी-तंत्र विद्यापीठात बौद्धिक संपत्ती अधिकार कक्षाची स्थापनाकेआयटी कॉलेजमधील ग्रंथपाल रोहन पवार यांना पीएचडी जाहीरजुनी पेन्शन संघटना करवीर शाखेतर्फे ७५ गुणवंत शिक्षकांचा गौरवअकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन ! गुणवत्तेनुसार सर्वसाधारण चार फेऱ्या!!शेतकरी संघाचा खत कारखाना सुरू होणार, अध्यक्षांची अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत चर्चाहायकोर्टाच्या स्थगितीनंतरही कोल्हापुरात संच मान्यतेची प्रक्रिया ! शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी भेटणार शिक्षणाधिकाऱ्यांना !!

जाहिरात

 

शक्तीप्रदर्शनाने जीवन पाटील यांचा बिद्रीसाठी उमेदवारी अर्ज

schedule30 Oct 23 person by visibility 324 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : "पारंपारिक वाद्यांचा गजर, बंटी साहेब तुम आगे बढो -हम तुम्हारे साथ है, जीवनदादा तुम आगे बढो - हम तुम्हारे साथ है" अशा घोषणा, कार्यकर्ते- शेतकऱ्यांची मोठी गर्दी आणि उत्साह वातावरणामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जीवन पाटील यांनी बिद्री साखर कारखान्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. गट क्रमांक पाच मधून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने जीवन पाटील यांनी शक्ती प्रदर्शन घडवले. तत्पूर्वी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांची भेट घेतली.
सध्या बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीचे धामधूम सुरू आहे. निवडणुकीसाठी सोमवारी, (३० ऑक्टोंबर) काँग्रेसकडून  उमेदवारांनी अर्ज दाखल केला. सासने मैदान येथे सगळे उमेदवार एकत्र आले होते. राधानगरी, भुदरगड, करवीर मतदार संघातील उमेदवारांचा समावेश होता.
 जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जीवन पाटील यांनी गट क्रमांक पाच मधून उमेदवारी अर्ज भरला आहे. सकाळी शक्ती प्रदर्शन घडवत ते कार्यकर्ते, ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांच्यासोबत कोल्हापुरात पोहोचले. सासने मैदान ते अजिंक्यतारा अशी मिरवणूक काढली. हलगीचा कडकडाट, विजयाच्या घोषणा अशा वातावरणात ही मिरवणूक निघाली. त्यानंतर निवडणूक कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज भरला.
यावेळी कूरचे सरपंच मदन पाटील, धारवाडचे शामराव मोहिते, संजय चौगुले, मिणचे बुद्रुकचे पांडुरंग मोळसकर, नाधवडेचे धनाजी पाटील, कोनवडेचे आबाजी कांबळे, अनिल हळदकर, भैरव कुंभार, आकुर्डैचे सतीश लोहार, निळपणचे राजेंद्र इंगळे, बसरेवाडी संदीप दळवी, नवरसवाडी आनंदा सोहणे, सरपंच साताप्पा परीट, बोंगाडेऺवाडी अशोक बोंगाडेऺ, कोळवंत सागर पाटील, गिरगावचे अजित देसाई, वाघापूरचे संजय दाभोळे, यांचे खुर्ची एनजी खापणे म्हणजे बुद्रुकचे ज्ञानदेव माने, म्हसवेचे पांडुरंग भोसले, बाबुराव पवार, प्रकाश माने आदीसह कार्यकर्ते शेतकऱ्यांचा सहभाग मोठा होता.
.............. ..............
 "यापूर्वी कारखाना संचालक व जिल्हा परिषद सदस्य म्हणून मतदारसंघांमध्ये विकास कामे मोठ्या प्रमाणात केले आहेत. कारखाना संचालक म्हणून काम करताना सभासदांच्या हाताला प्राधान्यक्रम देणारा कारभार केला. सभासदांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा निवड कारखाना निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. कार्यकर्ते शेतकरी नागरिक अशा हजारोंच्या उपस्थितीमध्ये कारखाना निवडणुकीसाठी गट क्रमांक पाच मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे."- जीवन पाटील, माजी सदस्य जिल्हा परिषद

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes