जलयुक्त शिवार योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी -
schedule21 Nov 23 person by visibility 427 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : संभाव्य दुष्काळाचे सावट ओळखून जिल्हा प्रशासनाने कोल्हापूर जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी असे पत्र माजी आमदार अमल महाडिक यांनी जिल्ह्याधिकारी राहुल रेखावार यांना दिले.
राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. जलसंपन्न असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यालाही दुष्काळाची झळ बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा विचार करून जिल्हा प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. राजाराम कारखान्याने गतवर्षी राबवलेले ओढा पुनरुज्जीवनासारखे कार्यक्रम जिल्हाभर राबवावेत. जलयुक्त शिवार योजनेतून ठिकठिकाणी जलसंधारणाची कामे करावीत अशी मागणी केली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत महाडिक यांनी जलसंधारणासाठी विशेष प्रस्ताव सरकारकडे पाठवावा अशी सूचना केली. शेतीसाठी पाण्याचे योग्य नियोजन झाल्यास टंचाई जाणवणार नाही असेही महाडिक म्हणाले. जिल्हाधिकारी रेखावार यांनी, शासनाकडे प्रस्ताव सादर करून निश्चितच योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन महाडिक यांना दिले.