+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustआपली उमेदवारी फाइनल, शिवसेनेतर्फे २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार-राजेश क्षीरसागर adjustजीएसटी अधिकाऱ्याला २५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले adjustउत्तम संवाद कौशल्य म्हणजे उत्तम करिअरची संधी- डॉ विश्वनाथ मगदूम adjustजिल्ह्यातील हॉटेल, बार, दारु दुकाने रात्री अकरानंतर बंद ! जिल्हा प्रशासनाचा आदेश adjustप्रत्येक निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमध्ये मतदानाचा चढता आलेख ! नवीन २६ मतदान केंद्रे !! adjustइचलकरंजी भाजपा कार्यालयात आवाडेंचे उत्साही स्वागत ! शशिकला जोल्ले, सुरेश हाळवणकरांनी केले स्वागत !! adjustजिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे आढावा बैठक adjustकरवीर तालुका शिक्षक-शिक्षकेतर पतसंस्थेतर्फे सभासदांना दीपावली भेट वस्तू वाटप adjustकोल्हापूर दक्षिणची जनता माझ्यासोबत ! निवडणुकीत नक्की पाठीशी राहील !! अमल महाडिक adjustजनसुराज्य जिल्ह्यात तीन जागा लढणार, उमेदवारही निश्चित
1001157259
1001130166
1000995296
schedule21 Jun 24 person by visibility 281 categoryमहानगरपालिका
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागाने २०२४-२५ या   आर्थिक वर्षातील घरफाळा बिलाच्या रक्कमेतून सहा टक्के सवलत योजना जाहीर केली आहे. या सवलत योजनेचे काहीच दिवस शिल्लक राहिलेने महापालिकेतर्फे सुट्टी दिवशीही नागरी सुविधा केंद्रे सुरु ठेवण्यात येणार आहे. 
ज्या मिळकतधारकांनी अद्यापही आपला घरफाळा भरणा केलेल नाही त्यांनी ३० जून अखेर तो भरुन  सवलत योजनेचा लाभ घ्यावा. यासाठी महापालिकेची सुविधा केंद्रे शनिवारी, २२ जून रोजी सकाळी  ९ ते  दुपारी ३.३० पर्यंत, सोमवार ते शुक्रवार २४ ते २८  जून या कालावधीत सकाळी नऊ ते सायंकाळीं सहापर्यंत व शनिवारी, २९ जून व  रविवारी, ३० जून २०२४  रोजी सकाळी ९ ते रात्री वाजेपर्यंतय सुरु ठेवण्यात येणार आहे.
            आतापर्यंत शहरातील आज अखेर ४०,९०८ इतक्या मिळकतधारकांनी या सवलत योजनेचा लाभ घेऊन रु१६ कोटी ७२ लाख इतकी रक्कम जमा केली आहे. ज्या मिळकधारकांना अद्यापही पोस्टामार्फत बिल मिळाले नसलेस त्यांनी जवळच्या विभागीय कार्यालयात जाऊन दुबार बिलाची प्रत प्राप्त करुन घेऊ शकतात तसेच, कोणत्याही नागरी सुविधा केंद्रात जावून आपला करदाता क्रमांक सांगून चालू वर्षाची रक्कम भरुन सहा टक्के सवलत योजनेचा लाभ घेता येईल. तसेच, गुगल पे, फोन पे, पेटीएम व महापालिका वेबसाईटवरुन ऑनलाईन पध्दतीने कराचा भरणा करता येईल. असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.