+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustसंयमाला मर्यादा,२४ तासात हल्ले थांबवा ! नाही तर मी बेळगावमध्ये जाणार !! adjustबेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड, सीमावाद चिघळला adjustराजेश क्षीरसागर फौंडेशनतर्फे सौंदतीत भाविकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा-अल्पोपहार वाटप. adjustकोल्हापुरात जानेवारीत निमंत्रितांच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धा adjustडॉ. जयसिंगराव पवार यांना ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव पुरस्कार प्रदान adjustपॅरा ओपन टेबल टेनिस स्पर्धेत विवेक मोरे तृतीय adjustशाहू गोल्ड कप, फुटबॉल अॅकॅडमीची मालोजीराजेंकडून घोषणा adjustमालोजीराजे, मधुरिमाराजे यांच्या हस्ते केएसए लोगोचे अनावरण adjustशिक्षक बदलीसाठी संदर्भ दिनांक ३० जून २०२३ गृहीत धरावा ! पुरोगामी शिक्षक संघटनेच्या राज्य सभेत ठराव !! adjust केआयटीत संवाद आयएएस अधिकाऱ्यांसोबत, उलगडली प्रशासक कादंबरी बलकवडेंची वाटचाल
Maharashtra-News-1IMG-20200920-WA0002
schedule04 Oct 22 person by visibility 230 categoryउद्योग
सोने खरेदी मजुरीवर वीस टक्के सवलत, चांदी खरेदी मजुरीवर पन्नास टक्के सवलत
महाराष्ट्र न्यूज 1 : जत येथील मंगळवार पेठेतील मे. प्रकाश शिवाप्पा बंडगर सराफ आणि जव्हेरी अर्थात ‘पीएसबी ज्वेलर्स’ हे ग्राहकांच्या हक्काचे आणि विश्वसनीय दुकान. सण असो की समारंभ ग्राहकांची पावले सोने-चांदी खरेदीसाठी हमखास ‘पीएसबी’ज्वेलर्सकडे वळतात. ग्राहकांचा विश्वास व वाढता प्रतिसाद पाहून  ‘पीएसबी’ज्वेलर्सने दसरा व दिवाळीनिमित्त ग्राहकांसाठी ऑफर जाहीर केली आहे. सोने-चांदी खरेदीवर भेटवस्तू देण्यात येत आहे. ग्राहकांना प्रत्येक खरेदीवर ही भेटवस्तू मिळणार आहे.
कलाकुसरीचे दागिने आणि उच्चप्रतीचे सोने ही पीएसबी ज्वेलर्सचे वैशिष्टय. पीएसबी ज्वेलर्सने ग्राहकहिताच्या अनेक योजना यापूर्वीं राबविल्या. सोने, चांदीच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले. सोने-चांदी खरेदीला विमा संरक्षणाचे कवच दिले. हॉलमार्कची सुविधा सुरू करत ग्राहकांना उच्च दर्जाचे शुद्ध सोने उपलब्ध करुन दिला.
‘पीएसबी ज्वेलर्स’चे मालक प्रकाश बंडगर म्हणाले, ‘दसरा-दिवाळी हे सण प्रत्येकासाठी आनंदाची, सुखाची बरसात करणारे आहेत. या दोन्ही सणाला नागरिक सोने, चांदी हमखास खरेदी करतात. पीएसबी ज्वेलर्सने ग्राहकांसाठी सोने, चांदी खरेदीवर भेट योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक खरेदीवर भेट वस्तू दिली जाते. शिवाय चांदी खरेदीवर मजुरीत ५० टक्के सवलत तर सोने खरेदीवर मजुरीत वीस टक्के सवलत योजना आहे.”