Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महापालिकेत महायुतीत मानापमान नाट्य, कार्यालय प्रवेश कार्यक्रमापासून शिवसेना नगरसेवक चार हात लांबसभागृह नेता, स्थायी समिती सभापतींचा कार्यालयीन प्रवेशईएसआय रुग्णालय - ओपीडीमधील समस्या तातडीने सोडवा : कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनची मागणीकोरे अभियांत्रिकीत सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांची विविध कंपन्यात निवडप्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावू या : अध्यक्षा शिल्पा खोत कलाकार - कामगारांचे स्वप्नं साकारण्यासाठी…वडिलांची ईच्छा पूर्ण करण्यासाठी महामंडळाच्या निवडणुकीत - संग्राम भालकरशिक्षक  - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही या पद्धतीने कामकाज करा, शिक्षक आमदारांच्या अधिकाऱ्यांना सूचनामहाव्दार रोड रिक्षा, चारचाकींसाठी खुला करावापश्चिम महाराष्ट्रातील पहिले इलेक्ट्रिक व्हेईकल प्रशिक्षण केंद्र विवेकानंद संस्थेतअभियांत्रिकी प्रवेशाच्या शंकांना मिळणार पूर्णविराम; केआयटीतर्फे रविवारी मोफत मार्गदर्शन कार्यक्रम

जाहिरात

 

तज्ज्ञ डॉक्टरांचे शनिवारी ओळख मधुमेहाची याविषयी मार्गदर्शन

schedule20 Jun 25 person by visibility 552 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आर एस एस डी आय महाराष्ट्र चॅप्टरच्यावतीने ‘ओळख मधुमेहाची’ यासंबंधी शनिवारी, (२१ जून २०२५) परिसंवाद आयोजित केला आहे. गायन समाज देवल क्लबमधील गोविंदराव टेंबे सभागृहात सायंकाळी पाच ते सात या वेळे हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती या संस्थेचे कोल्हापूरचे समन्वयक डॉ. राजेश देशमाने यांनी पत्रकार परिषदेत दिली. या परिसंवादाला खासदार श्रीमंत शाहू महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, या प्रतिसंवादात मुंबईच्या लिलावती हॉस्पिटलचे मधुमेह तज्ञ डॉ. विजय पाणीकर, मुंबईचे मधुमेह तज्ञ डॉ. विजय नेगलूर, डॉ. लोतीका पुरोहित, डॉ. संहिता वालावलकर, डॉ. राजीव कोविल, डॉ. मयूरा काळे आणि डॉ. निखिल नाशीककर हे तज्ञ डॉक्टर मधुमेहाबाबत परिपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत. विशेषबाब म्हणजे या कार्यक्रमांतर्गत मधुमेह, लठ्ठपणा आणि ३० पेक्षा जास्त बीएमआय असणाऱ्या सुमारे १२० ते १५० रूग्णांसाठी बाजारात २ हजार ते ३ हजार रुपये आकारणी केली जाणारी फायब्रोस्कॅन तपासणी या ठिकाणी मोफत केली जाणार आहे. या मोफत तपासणीचा लाभ घेण्यासाठी ९६३७३०२४२४ या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आणि शनिवारी २१ जूनला सायंकाळी ५ ते ७ या वेळेत देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे सभागृहात उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. देशमाने यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes